IMPIMP

Bank Rules | 1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ 7 महत्वाचे नियम, सॅलरीपासून पेमेंट सिस्टममध्ये होईल बदल; जाणून घ्या होईल फायदा

by nagesh
Top Stocks | top picks to invest by axis securities these five stocks can benefit from festive season

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Bank Rules | 1 ऑक्टोबरपासून बँक, शेयर मार्केट आणि सॅलरीसंबंधी अनेक नियमात बदल होणार आहेत. या बदलांचा संबंधी सामान्य माणसाच्या जीवनाशी आहे. यामध्ये बँकिंग नियम (Bank Rules) पासून LPG सह (LPG price) अनेक बदलांचा समावेश आहे. कोण-कोणते बदल होणार आहेत ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1. पेन्शच्या नियमात होईल बदल (Pension rules)

ज्या पेन्शनर्सचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ते 1 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतील.
उर्वरित पेन्शनर्स 1 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतील.

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचे काम पोस्ट ऑफिसद्वारे सुरू होत आहे. यासाठी भारतीय पोस्ट विभागाने सांगितले आहे की, जीवन प्रमाण सेंटरचा आयडी वेळेपूर्वी अ‍ॅक्टिव्हेट करा.
जर तो अगोदरपासून बंद असेल तर. ज्या हेड पोस्ट ऑफिसमध्ये जीवन प्रमाण सेंटर नाहीत, त्यांना ताबडतोब हे सेंटर बनवण्याचा आदेश जारी केला आहे.

सरकारनुसार जीवन प्रमाण सेंटर बनवल्यानंतर आयडी अ‍ॅक्टिव्हेट करावा लागेल. हेच काम पोस्ट ऑफिसमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी सुद्धा होणार आहे.
याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 ठरवली आहे.

हे काम पूर्णपणे ऑनलाईन झाल्याने पेन्शनर्सला बँकेच्या ब्रँच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.
जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन जमा करण्यासाठी घरबसल्या काम करता येऊ शकते.
यासाठी पेन्शनरला आधार नंबरवर तयार डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचा पुरावा घ्यावा लागेल.

 

2. ऑटो डेबिट – ग्राहकांची परवानगी आवश्यक

1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम (Auto debit payment system) लागू होत आहे. अशावेळी बँक खातेधारकांनी आपल्या अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर
(mobile number) आवश्यक अपडेट (update) केला पाहिजे. कारण तुमच्या मोबाईल नंबरवरच ऑटो डेबिटसंबंधी नोटिफिकेशन (notification) एसएमएसद्वारे (via SMS) पाठवले जाईल.

ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम लागू झाल्यानंतर वीजबिल, पाण्याचे बिल, गॅसचे बिल, लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) किंवा इतर कोणता खर्च ऑटो डेबिट मोडमध्ये टाकले आहे तर ठरलेल्या दिवशी खात्यातून पैसे कापले जातील.
यासाठी मोबाइल अ‍ॅप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये एखादा खर्च ऑटो डेबिट मोडमध्ये टाकावा लागेल. (Bank Rules)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

नियमानुसार पेमेंट ड्यू डेटच्या पाच दिवस अगोदर ग्राहकांना एसएमएसद्वारे पेमेंटची माहिती दिली जाईल.
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाइल अ‍ॅप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑटो डेबिट करण्यापूर्वी ग्राहकांना विचारले जाईल की त्यांना पेमेंट करायचे आहे किंवा नाही.

3. चालणार नाही जुने चेकबुक (Cheque book rules)

1 ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि MICR कोड इनव्हॅलिड होतील. या बँका आहेत – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC),
युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank). या बँका त्या आहेत ज्यांचे अलिकडेच इतर बँकांमध्ये विलिनिकरण झाले आहे.

या बँकांचे विलिनिकरण झाल्याने अकाऊंट हॉल्डरचे अकाऊंअ नंबर, आयएफएससी व एमआयसीआर कोडमध्ये बदल झाल्याने 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग सिस्टम जुने चेक रिजेक्ट करणार आहे. या बँकांचे सर्व चेकबुक आमान्य होतील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

4. पीएम किसानमध्ये करावे लागेल रजिस्ट्रेशन (PM kisan Samman Nidhi)

पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi) लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो.
दरम्यान, जे शेतकरी PM kisan Samman Nidhi चा लाभ घेत नाहीत, ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात.
रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

जर शेतकर्‍याचा अर्ज आता स्वीकारला गेला तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये 2000 रुपये खात्यात येतील. यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा 2000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात येईल.
म्हणजे जर तुम्हाला 4000 रुपये मिळवायचे असतील तर तुमच्याकडे 30 सप्टेंबरपर्यंतची चांगली संधी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते (government can double the amount of PM Kisan Yojana).
शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये दिले जातील, म्हणजे त्यांना दर चार महिन्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

5. गुंतवणुकसंबंधी नियमात होतील बदल (Mutual fund related rules)

मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) आता म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेऊन एक नवीन नियम केला आहे.
हा नियम असेट अंडर मॅनेजमेंट (AMC) म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणार्‍या ज्यूनियर कर्मचार्‍यांवर लागू होईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

6. LPG सिलेंडरच्या किमतीत होईल बदल (LPG price)

1 ऑक्टोबरपासून LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होईल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि कमर्शियल सिलेंडर (LPG gas cylinder) च्या नवीन किमती ठरवल्या जातात.

7. प्रायव्हेट दारूची दुकाने बंद (Liquor shop)

1 ऑक्टोबरपासून दिल्लीत प्रायव्हेट दारूची दुकाने बंद होतील. 16 नोव्हेंबरपर्यंत केवळ सरकारी दुकानांवर दारूची विक्री होईल.
डेप्युटी सीएम मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत राजधानी दिल्लीला 32 झोनमध्ये विभागून लायसन्स वाटप प्रक्रिया केली आहे.
आता 17 नोव्हेंबरपासून नवीन धोरणांतर्गत दुकाने उघडतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

Web Title : Bank Rules | what changes from tomorrow 1 october 2021 check details listhere

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भिकारी आणि भंगारवाल्यामुळे खुनाचा उलगडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Tax on Gold Investment | सोन्यात गुंतवणूक केल्यास कोण-कोणते टॅक्स द्यावे लागतात?, गुंतवणुकीचे प्रकार किती?; जाणून घ्या

Pune Coronavirus | पुणे जिल्ह्यात कोरोना काळात एक हजार 920 पोरं झाली पोरकी

 

Related Posts