IMPIMP

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क

by nagesh
Central Bank Of India | central bank of india to shut down 600 of its branches report

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bank Service Charges | बँक ग्राहकांसाठी धक्का देणारी बातमी आहे. काही बँकांनी त्यांच्या सेवांचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँकेने त्यांच्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज (Minimum Balance Charges), लॉकर चार्ज (Locker Charges) आणि खाते बंद करण्याचे शुल्क (Account Closure Charges) वाढवले आहे. (Bank Service Charges)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी आवश्यक सेवांसाठी शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. आता महानगरांतील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान 10 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. अन्यथा, त्यांना वेगळी फी भरावी लागेल. नवीन नियम 15 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

 

PNB मिनिमम बॅलन्स मर्यादा

ग्रामीण शाखेत 1000 रुपये

निमशहरी शाखेत 2000 रुपये

शहरी शाखेत 5000 रुपये

मेट्रो शहरांमध्ये 10,000 रुपये

यापूर्वी मेट्रो शहरांच्या शाखेत ही मर्यादा 5000 रुपये होती.

मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर…

– ग्रामीण आणि निमशहरी भागात प्रति तिमाही 400 रुपये शुल्क. आधी ते 200 रुपये प्रति तिमाही होते.

शहरी आणि मेट्रो भागात खात्यात पुरेशी शिल्लक न ठेवल्याबद्दल 600 रुपये तिमाही शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे शुल्क प्रति तिमाही 300 रुपये होते.

 

लॉकरचे शुल्कही वाढले
पंजाब नॅशनल बँकेने लॉकरच्या शुल्कातही वाढ (PNB Locker Charges Hike) केली आहे. आता बँकेचे ग्राहक वर्षातून 12 वेळा त्यांच्या लॉकरला मोफत भेट देऊ शकतात. यानंतर, त्यांच्याकडून प्रत्येक भेटीसाठी 100 रुपये आकारले जातील. पूर्वीच्या ग्राहकांना वर्षभरात 15 मोफत भेटी मिळत असत. बँकेने लॉकरचे शुल्कही 250 रुपयांवरून 500 रुपये केले आहे. (Bank Service Charges)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चालू खात्यावर जादा शुल्क
PNB मध्ये, जर तुम्हाला चालू खाते उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत ते बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी 800 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 600 रुपये होते.

 

एचडीएफसी बँकेनेही वाढवले शुल्क
पंजाब नॅशनल बँकेच्या धर्तीवर, खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या अनेक सेवांसाठी शुल्क वाढवले.

 

 

Web Title :- Bank Service Charges | bank service charges hdfc bank pnb minimum balance charges

 

हे देखील वाचा :

Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

Jalna Crime | मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या खूनाची सुपारी, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

 

Related Posts