IMPIMP

Baramati Bus Stand | बारामतीत होणार राज्यातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक

by nagesh
Baramati Bus Stand | Baramati will be the most modern bus stand in the state

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन –  बारामती बसस्थानकाची (Baramati Bus Stand) स्थिती दयनीय झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुढाकाराने जुन्या बसस्थानक जागेत नवीन सुसज्ज (Equipped) व अत्याधुनिक (sophisticated) सुविधा असलेले बसस्थानक (Baramati Bus Stand) उभारण्यात येत आहे. राज्यातील सर्वाधिक सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत आकार घेऊ लागले आहे. हे बसस्थानक 6 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती एसटी पुणे विभागाचे (Pune Division) प्रमुख रमाकांत गायकवाड (Ramakant Gaikwad) यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बारामती येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाला 50 कोटी रुपये खर्च येणार आहे. या बसस्थानकाची इमारत विमानतळाच्या (Airport) तोडीची असणार आहे.
नव्या बसस्थानकामध्ये (New bus Stand) 22 बसथांबे असणार आहेत. तेसच डेपोच्या पार्किंगमध्ये रात्री जवळपास 87 बसेस उभ्या राहतील.
याशिवाय 12 दुकान गाळे असणार असून यामध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी कँटीनची सोय केली जाणार आहे.

 

 

 

 

आगारप्रमुख (depot head) आणि स्थानक प्रमुखासाठी (station head) स्वतंत्र कार्यालयाची सुविधा असणार आहे.
तर महिला प्रवासी तसेच महिला वाहकांच्यासाठीही हिरकणी कक्ष असणार आहे. बसस्थानकाच्या आवारात आगारप्रमुखांसाठी निवासस्थाची सोय देखील करण्यात येणार आहे.
चालक व वाहकांसाठी प्रशस्त असलेला विश्रांती कक्षही तयार करण्यात येत आहे. (Baramati Bus Stand)

प्रवेशद्वाराची जागा बदलणार

सध्या इंदापूर रस्त्याच्या बाजूने बसेस बसस्थानात ये-जा करतात. हे काम पूर्ण झाल्यावर बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्वेच्या बाजूला केले जाणार आहे.
इंदापूर चौकापासून ते गुनवडी चौकापर्यंत गर्दी असते ही बाब विचारात घेता एसटीच्या वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी प्रवेशद्वाराची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title : Baramati Bus Stand | Baramati will be the most modern bus stand in the state

 

हे देखील वाचा :

Aquila Restaurant | साडीला Smart Dress न मानणारे रेस्टॉरंट ‘Aquila’ला लागलं कुलूप, ‘या’ कारणामुळे झाली कारवाई

Khadakwasla Irrigation Department | खडकवासाला पाटबंधारे विभागाचा कारभार तुटपुंज्या मनुष्यबळावर; 50 टक्के पदे रिक्त

Udayanraje Bhosale | आता नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना एकाचवेळी परभूत करण्याची राष्ट्रवादीची ‘रणनिती’

 

Related Posts