IMPIMP

Baramati Firing Case | बारामती गोळीबार प्रकरण: रणजित निंबाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या गौतम काकडेला अटक

by sachinsitapure

बारामती: Baramati Firing Case | बारामती गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम शहाजीराव काकडे (Gautam Shahajirao Kakade) यास ‘एलसीबी’च्या (Pune LCB) पथकाने भोर परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. बारामती जिल्ह्यातील सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या वादात रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यात त्यांचा मृ्त्यू झाला. दरम्यान या प्रकरणात आरोपी गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता. गोळ्या झाडल्यानंतर गौतम काकडे फरार झाले होते. शुक्रवारी पहाटे रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रविवारी गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली. गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता.

घटनेदिवशीच वडगाव निंबाळकर पोलिसांनी (vadgaon nimbalkar police station) या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (someshwar sugar factory) माजी अध्यक्ष शहाजी काकडे (Shahajirao Kakade) आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे (Gaurav Shahajirao Kakade) याला अटक केली होती.

काही दिवसांपूर्वी निंबूत (Nimbut Firing Case) येथील गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलाची खरेदी केली होती. ३७ लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरलेला होता. त्यामध्ये रणजीत निंबाळकर यांना पाच लाख रुपये गौतम काकडे यांनी विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम कागदपत्र पूर्ण करून देण्याचं ठरवण्यात आलं होतं.

गुरुवारी रात्री रणजीत निंबाळकर हे आपली पत्नी तसंच मित्रांसह निंबूत येथे गौतम काकडे यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी रणजीत निंबाळकर यांनी उर्वरीत रक्कम द्यावी, किंवा विसाराची रक्कम घेऊन बैल परत करा असे सांगितले. तुम्ही कागदपत्रांवर सह्या करा तुम्हाला सकाळपर्यंत पैसे मिळतील, असे गौतम काकडे सांगत होते. यातून दोघांमध्ये झालेल्या वादातून गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला.

Related Posts