IMPIMP

Basava Seva Pratishthan | महात्मा बसवण्णा स्थापित ‘अनुभव मंटप’ ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी; प्रसिध्द व्याख्याते बसवकुमार पाटील यांचे प्रतिपादन

बसव सेवा प्रतिष्ठानद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन

by nagesh
Basava Seva Pratishthan | 'Anubhav Mantap' established by Mahatma Basavanna is India's greatest gift to the world; Proposition by renowned lecturer Basavkumar Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Basava Seva Pratishthan | बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी ‘अनुभाव मंटप’ची (Anubhav Mantap) निर्मिती करून सर्व प्रथम लोकशाहीची स्थापना केली जी भारताने जगाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी होय. बसवण्णा जयंती निमित्त (Basaveshwar Jayanti 2023) ‘बसव सेवा प्रतिष्ठान, पुणेतर्फे वडगांव बुद्रुक (Vadgaon Budruk) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बसवकुमार पाटील (Basavkumar Patil ) बोलत होते. (Basava Seva Pratishthan)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ते म्हणाले की, ‘मानवता धर्म’हाच खरा धर्म आहे, श्रम करा, कुठलेही काम असो त्याला कमी समजू नका, ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी सर्वदूर बाहेर भटकण्याची गरज नाही, आपला देह हेच मंदिर असून ‘इष्टलिंग शिवयोग साधना’केल्यास ईश्वराचा साक्षात्कार होईल असे महात्मा बसवण्णांनी आपल्या एका वचनात सांगितल्याचे पाटील म्हणाले. (Basava Seva Pratishthan)

 

 

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बसव सेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान शिबिरात भाग घेतला होता. त्याचबरोबर, संस्थेने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सचिन लकडे (Dr. Sachin Lakde) यांनी आपले हृदय स्वस्थ आणि निरोगी कसे ठेवावे याविषयीची माहिती आणि उपयुक्त टिप्स अतिशय सोप्या शब्दात सांगितले. सकाळच्या सत्रात आयोजित केलेल्या या दोन्ही शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सायंकाळी बसवकुमार पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.
सर्वप्रथम बसवकुमार पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवण्णांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन
करण्यात आले. बसव सेवा प्रतिष्ठान, च्यावतीने मान्यवरांचा महात्मा बसवण्णांची पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

बसव सेवा प्रतिष्ठान, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पुणे परिसरातील अनेक
लिंगायत समाज (Lingayat Samaj) बांधव आपल्या परिवारांसह उपस्थित होते. कार्यकामानंतर सर्वांसाठी
महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसव सेवा प्रतिष्ठान,
पुणेचे सर्व पदाधिकारी व लिंगायत समाज (Lingayat Community) बांधव यांचे सहकार्य लाभले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Basava Seva Pratishthan | ‘Anubhav Mantap’ established by Mahatma Basavanna is India’s greatest gift to the world; Proposition by renowned lecturer Basavkumar Patil

 

हे देखील वाचा :

Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर

Pune Police Crime News | अवैध धंद्यांबाबत DG कंट्रोलकडून शहर नियंत्रण कक्षात ‘कॉल’, पोलिस आयुक्तांचे ‘क्रॉस रेड’ करण्याचे उपायुक्तांना आदेश

Pune Crime News | ICICI बँकेच्या मॅनेजरने घातला २७ लाखांचा गंडा; पोर्ट फोलिओमध्ये बनावट एन्ट्री करुन केली फसवणूक

 

Related Posts