IMPIMP

Budget 2024 | अर्थसंकल्पात आई-वडील आणि आजी-आजोबांना मिळेल विशेष भेट! टॅक्ससंबंधी ‘हे’ 5 फायदे देऊ शकते सरकार

by sachinsitapure

नवी दिल्ली : Budget 2024 | अर्थसंकल्पाकडून कोट्यवधी देशवासीयांना दरवर्षी मोठ्या अपेक्षा असतात. पैसेवाल्यांपासून गरीबापर्यंत सर्वांना ही अपेक्षा असते. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करू शकतात. तरूण, महिला आणि नोकरदारांसह, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहे. अर्थमंत्री ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्वाच्या घोषणा करू शकतात.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही मोठ्या घोषणा करू शकतात. यामध्ये कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलतीची मर्यादा, होम रेंटवर डिडक्शनचा लाभ, हेल्थ पॉलिसीवर जास्त कर सवलतीसह ५ महत्वाच्या घोषणांचा समावेश आहे.

कॅपिटल गेन टॅक्स सवलत

सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी शेयर आणि म्युच्युअल फंड्समध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलतीची मर्यादा वाढवू शकते.

घरभाडे कर कपात

देशात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे भाड्याच्या घरात राहतात. यामुळे दरवर्षी भाडे भरण्यात मोठा पैसा खर्च होतो. यासाठी अर्थसंकल्पात सरकार अशा ज्येष्ठांना हाऊस रेंटवर टॅक्स डिडक्शनाची सुविधा देऊ शकते.

हेल्थ पॉलिसीवर जास्त सवलत

मागील काही वर्षापासून हेल्थ पॉलिसीच्या प्रीमियमवर डिडक्शनची मर्यादा वाढलेली नाही. सध्या ज्येष्ठांसाठी हेल्थ पॉलिसीच्या प्रीमियमवर डिडक्शन मर्यादा ५०,००० आहे. अशावेळी सरकारने ती वाढवून किमान १ लाख रुपये करण्याची गरज आहे.

याशिवाय, सरकारने टॅक्स सेविंग इन्स्ट्रूमेंटमध्ये ज्येष्ठांच्या गुंतवणुकीवर लॉक इन पीरियड कमी केला पाहिजे. सध्या, बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये टॅक्स सेविंग एफडीवर लॉक इन पीरियड ५ वर्ष आहे. तर, सेक्शन ८०टीटीबीची मर्यादा वाढविण्याची मागणी सुद्धा आहे.

Related Posts