IMPIMP

Budget 2024 | कधी सादर होईल देशाचा अर्थसंकल्प आणि काय-काय असेल यामध्ये विशेष? आली ‘ही’ मोठी अपडेट

by sachinsitapure

नवी दिल्ली : Budget 2024 | एनडीए सरकार (NDA Modi Govt) पुढील महिन्यात आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यासाठी तयारी सुरू आहे. मात्र, अजूनपर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेचा खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु सरकारी सूत्रांनुसार अर्थमंत्री १८ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करू शकतात.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, १८ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थ संकल्प सादर करू शकतात. संसदीय कार्य मंत्रालयाने घोषणा केली आहे की, १८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होईल आणि ३ जुलैपर्यंत चालेल. तर संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे आणि ९ ऑगस्टपर्यंत ते चालण्याची शक्यता आहे.

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली असून प्रथम त्या महसूल सचिवांसोबत बैठकीनंतर उद्योग क्षेत्रातील हितधारकांसोबत अर्थसंकल्पापूर्वी बैठक घेतील. आर्थिक वर्ष २०२५ साठी अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केले होते.

अर्थसंकल्पात काय असेल विशेष?

* लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने एनडीए सरकार अर्थसंकल्पात सामान्य जनतेपासून टॅक्सपेयर्स आणि नोकरदारांसाठी मोठ्या घोषणा करू शकते.

* मध्यम वर्गावर सरकारचा विशेष फोकस राहू शकतो. त्यांना इन्कम टॅक्समध्ये दिलासा मिळू शकतो.

* अर्थमंत्री टॅक्स नियमात बदल करू शकतात.

* सध्या ३ लाख रुपये कमावत असलेल्यांना कोणताही टॅक्स नाही, ही मर्यादा ५ लाख रुपये केली जाऊ शकते.

Related Posts