IMPIMP

Budget 2025 | नोकरीबाबत मोठी घोषणा होणार का? मोदी सरकार 3.0 च्या बजेटमध्ये काय असेल विशेष

by sachinsitapure

नवी दिल्ली : Budget 2025 | मोदी सरकारचा (NDA Modi Govt) तिसरा कार्यकाळ आल्यानंतर जुलैमध्ये पूर्ण बजेट सादर करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी सरकारचा फोकस नोकरीच्या संधी वाढवण्यावर असू शकतो. सरकार रोजगार वाढवण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमची कक्षा वाढवणार आहे. या योजनेत आता फर्नीचर, खेळणी, पादत्राणे आणि कापड उद्योगाचा समावेश केला जाईल.

तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन दिले जाईल. महिलांचे उत्पन्न वाढवणे आणि देशाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर जोर दिला जाईल. हे सर्व मुद्दे सरकारच्या १०० दिवसांच्या अजेंड्याचा भाग आहेत आणि यातून २०३० सालापर्यंत लक्ष्य प्राप्त करण्यात मदत होईल.

याशिवाय अर्थ मंत्रालय मध्यम वर्गीयांना दिलासा देण्याच्या उपायांवर विचार करत आहे. यामध्ये केवळ टॅक्समध्ये सूटचा समावेश होणार नाही तर होम लोनवर सवलतीचा व्याजदर आणि इतर उपायांचा सुद्धा समावेश असू शकतो. निवडणुकीनंतर सध्या यावर प्राथमिक चर्चा आहे, परंतु निकाल लक्षात घेता सरकारकडून योग्य निर्णय घेतला जाइृल.

टाइम्‍स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित बातमीनुसार, मागील आठवड्यात मंत्र्यांनी कार्यभार सांभाळला आहे आणि पंतप्रधान मोदी दौऱ्यावर होते. अशावेळी यावर सविस्तर चर्चा सुरू झालेली नाही.

२५ जूनच्या जवळपास अर्थमंत्री निर्मला सीतारमण इकोनॉमिस्ट, अ‍ॅग्रीकल्चर सेक्‍टरचे एक्‍सपोर्टर, मार्केट पार्टी‍िस‍पेंट, बँकर आणि लेबर युनियनसह इतर लोकांना भेटतील.

तसेच अर्थमंत्री शनिवारी राज्याच्या अर्थमंत्र्यांचे बजेटवर मत घेतील. यानंतर दुपारी त्यांच्यासोबत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सहभागी होतील. जास्त उद्योगांना पीएलआय योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मोठ्या कालावधीपासून प्रलंबित आहे. विशेषता केमिकल्स सेक्टरसाठी जिथे युरोपियन कंपन्या कमी गुंतवणूक करत आहेत. परंतु सरकारला ही चिंता आहे की, किती मोठ्या गुंतवणुकीला चालना द्यायची आहे, कारण देशात मोठ्या जागतिक कंपन्या बनवायच्या आहेत.

छोट्या व्यवसायिकांना बळ देण्यासाठी एमएसएमई पॅकेज आणण्याची योजना आहे. परंतु, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोरोना नंतर छोटे व्यवसायिक संकटात आहेत. रोजगार निर्मितीसाठी हे पॅकेज आणले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी चिंता रोजगार आणि महागाईची होती. देशातील तरूणांचे म्हणणे आहे की, याबाबतीत भाजपाला अपयश आले आहे. त्यामुळे सरकार या बजेटमध्ये रोजगार निर्मितीवर जास्त भर देणार आहे.

Related Posts