IMPIMP

Builder Vishal Agarwal | महाबळेश्वर: बिल्डर विशाल अगरवालच्या हॉटेलचे बेकायदेशीर बार सील

by sachinsitapure

सातारा: Builder Vishal Agarwal | सातारा जिल्हा (Satara News) प्रशासनाकडून महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील विशाल अगरवाल याच्या MPG क्लब मधील बार (MPG Club Bar Seal) गुरुवारी रात्री सील करण्यात आला. हा बार अनधिकृत असल्याचे समोर आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

गुरूवारी माध्यमांशी संवाद साधत महाबळेश्वर मधील हॉटेलप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ” पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अगरवाल याच्या कुटुंबाने (Agarwal Family Pune) जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवावा. अशा कारवाईच्या सूचना पोलीस, पालिका प्रशासनास दिल्या आहेत.”

महाबळेश्वरमध्ये सुरेद्रकुमार अगरवाल (Surendra Kumar Agarwal) यांच्या नावाने महाबळेश्वर पारसी जिमखान्यामध्ये क्लब आणि रिसॉर्ट आहे. या क्लबबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या.

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क पथकाने (State Excise Department) चौकशी केली. यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं MPG क्लबचा बार अखेर सील करण्यात आला आहे.

Related Posts