IMPIMP

Central Bank Of India बँकेवर मोठे संकट ! बंद कराव्या लागतील 600 ब्रँच; तुमचे एखाद्या शाखेत खाते आहे का ?

by nagesh
Central Bank Of India | central bank of india to shut down 600 of its branches report

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Central Bank Of India | जर तुमचे खाते सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेने मोठ्या प्रमाणात शाखा बंद करण्याचा विचार केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, बँक आपल्या देशभरातील 13 टक्के शाखा बंद करण्याचा विचार करत आहे. (Central Bank Of India)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देशभरात 4594 शाखा
बँक मार्च 2023 पर्यंत देशभरातील 600 शाखा बंद करण्याचा किंवा तोट्यात चाललेल्या शाखांचे विलीनीकरण (Merger) करण्याचा विचार करत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरात 4594 शाखा (Branches) आहेत.

 

2017 मध्ये पीसीए यादीत सूचीबद्ध
2017 मध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांना आरबीआयच्या प्रॉम्पट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (PCA) यादीत टाकण्यात आले होते. वाईट आर्थिक स्थितीतून जात असलेल्या बँकांना या यादीत टाकण्यात आले आहे. (Central Bank Of India)

 

2018 मध्ये 12 बँकांना पीसीएमध्ये
या यादीत येणार्‍या बँकांना अनेक बंधने घालून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देण्यात आली होती. 2018 मध्ये देखील 12 बँकांना आरबीआयच्या पीसीए फ्रेमवर्कमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये 11 सरकारी आणि एक खाजगी बँक होती. ज्यांना अतिरिक्त खेळते भांडवल प्रदान करण्यात आले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतर सर्व बँकांची आर्थिक स्थिती सुधारली
मीडिया रिपोर्टनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वगळता इतर सर्व बँका पीसीए (PCA) यादीतून बाहेर आल्या आहेत. परंतु आर्थिक स्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सेंट्रल बँक या यादीत राहिली. अशावेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने 13 टक्के शाखा बंद करण्याचा विचार केला जात आहे.

 

Web Title :- Central Bank Of India | central bank of india to shut down 600 of its branches report

 

हे देखील वाचा :

Digital Banking In India | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका सुरू होणार

Watermelon For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण कलिंगड खाऊ शकतात का? जाणून घ्या सत्य

Vasant More | ‘लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून लढाई हरत नाही’ – वसंत मोरे

 

Related Posts