IMPIMP

Chandrakant Patil-Sharad Pawar | ‘बुडत्या जहाजाचे कॅप्टन पद घेण्यास शरद पवार यांचा नकार’ – चंद्रकांत पाटलांचा जोरदार टोला

by nagesh
Sharad Pawar on Chandrakant Patil | sharad pawar had also said that he would go to the himalayas says chandrakant patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil – Sharad Pawar | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा (Kolhapur Assembly By – Election) प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस (BJP And Congress) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत ऑनलाईनद्वारे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न आहे. 1 हजार रुपये जरी अशा पद्धतीने वाटले तर त्याची ED कडे चौकशीची मागणी करू आणि ईडी निश्चितच त्यांच्यावर कारवाई करेल,’ असं ते म्हणाले. (Chandrakant Patil – Sharad Pawar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”सतेज पाटील (Satej Patil) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) काही नेते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. इतके सगळे असूनही सतेज पाटील कॅबिनेट मंत्री होऊ शकले नाहीत. काँग्रेसचे राज्य अध्यक्षही झाले नाहीत. ते महापालिका, जिल्हा परिषदेतच रमले. एका गिरणी कामगाराचा मुलगा इतकी प्रगती करतो हे त्यांना बघवत नाही. म्हणून ते माझ्यावर कोल्हापुरातून पळून गेलो,” अशी टीका करतात. (Chandrakant Patil-Sharad Pawar)

 

UPA आघाडीचे अध्यक्षपद घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. यावरही चंद्रकांत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. त्यावेळी पाटील म्हणाले, ”बुडत्या जहाजाचे कॅप्टन पद कोण घेणार ? म्हणून यूपीएचे अध्यक्षपद घेण्यास शरद पवार (Sharad Pawar) यांनी नकार दिला,” असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”आमच्या पक्षात नेत्यांच्या आदेशाला महत्त्व आहे.
त्यामुळे मी कोथरूडमधून निवडणूक लढवली. विकासकामांसाठी कधीही बिंदू चौकात यायला तयार आहे.
मी धर्मांध नाही, पण धर्माभिमानी आहे ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका सर्वसामान्य हिंदूला आनंद देणारी आहे.
राज यांच्या भाषणामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली.
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असे विधानही राज यांनी केले होते. त्यांच्याशी मी 100 टक्के सहमत असल्याचं पाटील म्हणाले.”

 

Web Title :- Chandrakant Patil-Sharad Pawar | sharad pawar refuses to become captain of sinking ship says chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या

Pune Crime | हातावरील गोंदलेला ओम अन् चप्पलने फुटली खूनाचा वाचा; दौंडमधील एकाला अटक

 

Related Posts