IMPIMP

Chhagan Bhujbal | SPPU मध्ये लवकरच सावित्रीबाईंचा पुतळा – छगन भुजबळ

by nagesh
Chhagan Bhujbal | NCP Minister chhagan bhujbal savitribai phule statue savitribai phule pune university SPPU

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Chhagan Bhujbal | पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात SPPU (savitribai phule pune university) लवकरच सावित्रीबाईंचा पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारी रोजी या पुतळ्याची स्थापना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) असे नाव दिले आहे. या विद्यापीठाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), शाहू महाराज (Shahu Maharaj), महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) असे अनेक पुतळे आहेत. परंतु नेमका सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात सावित्रीबाईंचा पुतळा असावा यासाठी विद्यापीठ आणि सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पुतळा बनवण्यासाठी टाकला आहे. तो लवकरच तयार होईल. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारी रोजी या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी असं पुतळा कमिटीच्या सदस्यांचं मत असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.

 

तसेच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठात नेमका कुठे बसवावा यासाठी अनेक जागा सुचवण्यात आल्या आहेत. परंतु सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपासच हा पुतळा असावा असे सुचवण्यात आले आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर हा पुतळा कुठे बसवण्यात यावा हे ठरवले जाईल असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Chhagan Bhujbal | NCP Minister chhagan bhujbal savitribai phule statue savitribai phule pune university SPPU

 

हे देखील वाचा :

Crime News | धक्कादायक ! प्रियकराच्या लग्नात प्रेयसीनं केलं डायरेक्ट ‘हे’ कृत्य; धक्का सहन न झाल्याने नवरीच्या मामाचा मृत्यू

Thane Crime | उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या महिलेच्या करामतीने पोलिसही चक्रावले; समोर आले तिनं केलेले ‘प्रताप’

Rajiv Gandhi Zoological Park Pune Reopen | तब्बल 19 महिन्यांपासून बंद असलेलं पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले होणार; जाणून घ्या तारीख

 

Related Posts