IMPIMP

Conjunctivitis Babies Eyes | ‘या’ 5 कारणांमुळे लहान मुलांचे डोळे होऊ शकतात लाल, घरगुती उपायांनी ठिक करा

by nagesh
Conjunctivitis Babies Eyes | conjunctivitis babies eyes can be red due to these 5 reasons fix them with home remedies

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Conjunctivitis Babies Eyes | मुलांची त्वचा अतिशय मऊ आणि संवेदनशील असते. याशिवाय त्यांचे डोळे अतिशय नाजूक असतात. लहान मुले आणि अर्भकांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते, त्यामुळे त्यांना कंजक्टिवायटिस म्हणजेच पिंक आय होण्याची शक्यता असते. लहान मुलांमध्ये डोळ्यांचे संक्रमण सामान्य आहे. अशा परिस्थितीत त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. (Conjunctivitis Babies Eyes)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

लहान मुलांचे डोळे लाल झाल्याने त्यात कोरडेपणा, खाज सुटणे, पाणी येणे सुरू होते. त्यामुळे पालक घाबरतात. डोळ्यांच्या संसर्गावर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. काही संसर्ग घरगुती उपचारांनी बरे करता येतात, तर काहींना औषधे आणि अतिरिक्त काळजीची आवश्यकता असते. डोळ्यांच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पुरळ, जास्त पाणी येणे किंवा डोळे लाल, चिकट किंवा सुजणे यांचा समावेश होतो. (Conjunctivitis Babies Eyes)

 

अ‍ॅलर्जी :
अ‍ॅलर्जी हे डोळे लाल होण्याचे मुख्य कारण आहे. कधीकधी यामुळे मुलांचे डोळे लाल होतात. अ‍ॅलर्जीचे कारण धूळीचे कण, एखाद्या उत्पादनाचा वापर, इत्यादी असू शकते. अ‍ॅलर्जीमुळेही डोळ्यांतून पाणी येऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

बिल्नी (स्टाई) :
Bilny (stye) ला वैद्यकीय परिभाषेत हॉर्डिओलम म्हणतात. याला हिंदीत अंजनहरी आणि गुहेरी असेही म्हणतात. पापणीवर किंवा पापणीच्या आतील बाजूस हा एक लहान, लाल किंवा पिवळा दाणा असतो आणि तो वेदनादायक देखील असतो. बिल्नी हे सहसा पापणीच्या केसांच्या मुळाशी किंवा पापणीच्या ग्रंथीला जीवाणू (बॅक्टेरिया) संसर्ग झाल्यामुळे होतात. सूज कमी करण्यासाठी आणि बिल्नी ठिक करण्यासाठी बाळाच्या डोळ्याला उबदार कपड्याने शेक द्या. (Conjunctivitis Babies Eyes)

 

ब्लेफेरायटिस :
मुलांपेक्षा प्रौढांमध्ये ब्लेफेरायटिस अधिक सामान्य आहे. जेव्हा पापण्यांच्या कडा लाल होतात आणि सुजतात तेव्हा ब्लेफेरायटिस होतो.
हे पापणीमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकते. सहसा यामुळे, मुलाच्या पापण्या एकमेकांना चिकटतात. पापण्यांच्या मुळांवर एक पापडी देखील असू शकते.
डोळ्यांवर उबदार कपड्याने शेक घ्या, कोमट पाण्यात रुमाल बुडवा आणि 10 मिनिटे डोळ्याला शेक द्या.
गोलाकार हळुहळु मालिश करा. रुमाल थंड झाल्यावर बदला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

लहान मुलांचे डोळे लाल होत असतील तर त्यासाठी घाबरण्याची गरज नाही.
या घरगुती उपायांचा अवलंब करूनही जर मुलांच्या डोळ्यांची लालसरपणा कमी होत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

 

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.
त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.

 

Web Title :- Conjunctivitis Babies Eyes | conjunctivitis babies eyes can be red due to these 5 reasons fix them with home remedies

 

हे देखील वाचा :

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

Sushant Singh Rajput Sister | सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने शेअर केला बोल्ड फोटो तर सुशांतचे चाहते संतापले

 

Related Posts