IMPIMP

Corporator Avinash Ramesh Bagwe | नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांच्या निधीतून प्रभाग 19 मधील ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे भूमिपूजन

by nagesh
Corporator Avinash Ramesh Bagwe | Bhumi Pujan of Sant Santaji Maharaj Jagannade Udyan in Ward 19 with the funds of Corporator Avinash Ramesh Bagwe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Avinash Ramesh Bagwe | संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या सोबत ज्यांनी टाळकरी म्हणून काम केलं, तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लिहिण्याचे काम केले व पुढे लोकांसमोर आणून त्यातुन समाज प्रबोधनाचे महान कार्य केले ते थोर ‘संत संताजी महाराज जगनाडे’ यांचे कार्य लोकांपुढे येण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होईल, असे मत माजी आमदार उल्हास पवार (Former MLA Ulhas Pawar) यांनी व्यक्त केले. प्रभाग क्र. 19 पुणे महानगर पालिका हद्दीतील सेव्हन लव्हज चौक (Seven Loves Chowk) जवळील उड्डाण पूलाचे खालील मोकळ्या जागेत पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वतीने नगरसेवक अविनाश रमेश बागवे (Corporator Avinash Ramesh Bagwe) यांच्या निधीतून विकसित होत असलेल्या ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे (Sant Santaji Maharaj Jagannade Udyan) भूमिपूजन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे भूमिपूजन बुधवारी (दि.16) उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार उल्हास पवार यांचे हस्ते आणि माजी गृह राज्य मंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी (Congress Committee) रमेश बागवे (Ramesh Bagwe), नगरसेवक व पुणे मनपा गटनेते काँग्रेस पक्ष आबा बागुल (Corporator Aba Bagul), नगरसेवक विशाल धनवडे (Corporator Vishal Dhanwade) यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

 

रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले कि, या उद्यानाच्या माध्यमातून तिळवण तेली समाजाची पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात अनेक वर्षा पासून होत असलेली मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे.
यासाठी पुणे मनपा व सर्व पदाधिकारी, नगरसेवक ज्यांनी यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे अभिनंदन.

 

यावेळी सुदुंबरे संस्थान अध्यक्ष शिवदास उबाळे, पुणे तेली समाज अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)
तेली समाज अध्यक्ष शिवराज शेलार, सुदुंबरे संस्थान कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, सुदुंबरे संस्थान मुख्य चिटणीस ॲड. राजेश येवले,
आर्किटेक्ट अभिजित पन्हाळे, सुदुंबरे संस्थान खजिनदार दत्तात्रय शेलार, पिंपरी चिंचवड तेली उपाध्यक्ष समाज संजय जगनाडे,
माजी अध्यक्ष सुदुंबरे संस्थान जनार्दन जगनाडे तसेच ॲड. आनंद धोत्रे, प्रदीप उबाळे इत्यादी मान्यवर व तिळवण तेली समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नियोजित उद्यानास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याबाबत पुणे महानगर पालिका यांच्याकडे उपाध्यक्ष सुदुंबरे (Sudumbare) संस्थान व माजी अध्यक्ष पुणे तिळवण तेली समाज विजयकुमार शिंदे यांनी प्रस्ताव सादर केला असून गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला आहे.
यासाठी मुख्य चिटणीस सुदुंबरे संस्थान ॲड. राजेश येवले यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, रोहित अवचित,
सुरेखा खंडागळे व यासेर बागवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अविनाश बागवे (Corporator Avinash Ramesh Bagwe) यांनी केले.
या प्रसंगी उल्हास पवार, रमेश बागवे आणि आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.
विजयकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोज यांनी केले.

 

Web Title :-  Corporator Avinash Ramesh Bagwe | Bhumi Pujan of Sant Santaji Maharaj Jagannade Udyan in
Ward 19 with the funds of Corporator Avinash Ramesh Bagwe

 

हे देखील वाचा :

Gold In Iron Ore | काय सांगता ! होय, गोव्यात लोहखनिजातून निघतंय सोनं

Onion Oil Benefits | केस गळणे आणि कोंड्याच्या समस्येतून मुक्त करणार घरी बनवलेल्या कांद्याचं तेल, जाणून घ्या

Pune Corporation Elections (PMC Elections) | पुणे महापालिका निवडणुकीत RPI ला पाहिजेत 25 जागा

 

Related Posts