IMPIMP

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

by nagesh
Cryptocurrency | cryptocurrency 6 crypto coins gain up to 234075 pc in a day check details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Cryptocurrency | बिटकॉइनचे मूल्य (Bitcoin Price in India) बुधवारी व्रिकमी 66,000 डॉलरच्या पुढे गेले आहे. यामुळे बाजारात उत्साह आहे. आर्थिक संस्थांमध्ये बिटकॉइनची लोकप्रियता वाढत आहे, असे म्हटले जात आहे. बिटकॉइनचे मूल्य 7.6 टक्के वाढून 66,901.30 डॉलरवर पोहचले. यानंतर ते आणखी वाढले आणि 67,016 डॉलर (Cryptocurrency) झाले.उन्हाळ्यात ते 30,000 डॉलरच्या खालच्या स्तरावर आले होते. कॉइनडेस्कनुसार, यापूर्वी बिटकॉइनचा विक्रम 64,889 डॉलरचा (Cryptocurrency) होता. चांगली गोष्ट ही आहे की, Bitcoin ची किंमत जरी खुप जास्त असली तरी तुम्ही 500 रुपयांनी सुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सिंगापुर येथील Stack Funds चे COO मॅट डिब यांनी म्हटले की, आता बिटकॉइनचे रेट आणखी वाढतील. ते 80 ते 90 हजार डॉलरपर्यंत जाऊ शकतात.
परंतु यामध्ये चढ-उतार सुद्धा पहायला मिळेल. मागील काही दिवसात ट्रेडर्सने Bitcoin Futures मध्ये गुंतवणुकीसाठी जास्त पैसे काढण्यास सुरूवात केली आहे.
Bitcoin च्या नंतर दुसरी सर्वात मोठी करन्सी असलेल्या Ether ची किंमत 4203 डॉलर झाली आहे.

एक दिवसापूर्वी बिटकॉइन संबंधी एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (ETF) गुंतवणुकदारांनी मोठी रुची (Cryptocurrency) दाखवली.
यातून सुद्धा क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन मिळाले. ईटीएफ बिटकॉइनमध्ये थेट गुंतवणूक करत नाही. तो बिटकॉइन संबंधी वायदा बाजारात गुंतवणूक करतो.
उद्योगाचे म्हणणे आहे की ईटीएफद्वारे नवीन श्रेणीतील गुंतवणुकदार बिटकॉइनसोबत जोडलेले राहिले आहेत. ट्रेडर्सचे म्हणणे आहे की, Bitcoin ETF च्या येण्याने आभासी चलनात गुंतवणुक वाढली.

 

 

वाढत आहेत दर

बिटकॉइन एक डिसेंट्रलाईज्ड डिजिटल चलन आहे, जे जानेवारी 2009 मध्ये बनवण्यात आले होते. कोणत्याही Bitcoin Exchange च्या द्वारे ते खरेदी करता येऊ शकते.
2019 च्या अखेरीस त्याची किंमत 7 हजार डॉलरच्या जवळपास होती.
याच्या 1 वर्षानंतर ते वाढून 29 हजार डॉलरच्या जवळ पोहचले. एप्रिल 2021 मध्ये ते 64 हजार डॉलरच्या जवळ गेले.
आणि आता 66 हजारवर पोहचले (Cryptocurrency) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

भारतात कशी करू शकता खरेदी

Bitcoin ची भारतात खरेदी करण्यासाठी अनेक एक्सचेंज काम करत आहेत. याच्या खरेदीपूर्वी तुम्हाला तुमचे KYC करावे लागेल.
यासाठी Aadhaar आणि Pan Card ची गरज भासते. पेमेंट NEFT, RTGS, Debit किंवा Credit Card द्वारे होईल.

 

 

कुणाकडे सर्वात जास्त बिटकॉइन

बिटकॉइनचा सर्वात मोठा साठा Microstrategy कडे आहे. या कंपनीकडे 1,14,041 बिटकॉइन आहेत. कंपनीने 3.16 अरब डॉलरमध्ये त्यांची खरेदी केली.
तर Tesla कडे 43,200 बिटकॉइन आहेत. त्यांची किंमत वाढून 2.6 अरब डॉलर झाली आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com  कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Cryptocurrency | bitcoin buying in india know what is bitcoin how to buy it and how transaction works

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरींचा खुलासा, म्हणाले…

‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.

Anti Corruption Bureau Nagar | लाच प्रकरण ! अहमदनगर मनपाचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकरच्या पुण्यातील घरात सापडलं ‘घबाड’

 

Related Posts