IMPIMP

Dark Web | हे इंटरनेटचे ते काळे जग जिथे शस्त्र, ड्रग्जपासून विकले जातात परीक्षांचे पेपरसुद्धा

by sachinsitapure

नवी दिल्ली : Dark Web | नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आयोजित केलेल्या नीट यूजी परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप झाल्यानंतर ती (NEET UG Exam) रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीसुद्धा पेपर लीक झाल्याचे मान्य करत म्हटले की, यूजीसी नेट परीक्षा यासाठी रद्द करण्यात आली कारण गृह मंत्रालयाची सायबर विंग I4C ला परीक्षेच्या दिवशी ३ वाजता डार्क वेब (Dark Web) वर नेटचा पेपर मिळाला होता.

प्रधान यांनी म्हटले की, डार्क वेबवरील प्रश्नपत्रिका सध्याचा यूजीसी नेटच्या प्रश्नप्रत्रिकेशी मिळती-जुळती आहे. हे पाहता परीक्षा तातडीने रद्द केली. यूजीटी नेट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर आता डार्क वेब सुद्धा चर्चेत आहे. हे डार्क वेब काय आहे (What Is Dark Web)? ते कसे काम करते? डार्क वेबचा वापर सामान्य माणूस करू शकतो? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

आपण ज्या इंटरनेटचा वापर करतो, त्यास सरफेस वेब (Surface Web) अथवा ओपन वेब म्हणतात. हा एकुण इंटरनेटचा केवळ ४ टक्के भाग आहे. इंटरनेटचा ९६ टक्के भाग डार्क वेब आहे. हा इंटरनेटचा एक एन्क्रिप्टेड भाग आहे जो सामान्य लोकांना दिसत नाही. तो गुगल आणि याहूसारख्या सर्च इंजिनने अ‍ॅक्सेस करता येत नाही.

यापर्यंत पोहोचण्यासाठी टॉर (TOR- The Onion Router) सारख्या विशेष ब्राऊझरची अथवा कस्‍टम सॉफ्टवेयरची गरज असते. ज्याप्रकारे सरफेस इंटरनेटच्या वेबसाईटच्या अ‍ॅड्रेसच्या पाठीमागे .com अथवा .in असते, तसेच डार्क वेबवर बहुतांश वेबसाइट्सच्या पाठीमागे .onion असते.

ट्रॅक करणे का आहे अवघड?

डार्क वेबचा वापर करणारा यूजर ओळखणे खुप अवघड असते. डार्क वेबवरील वेबसाइटला फोरम, आणि मार्केट प्लेसला टॉर एन्क्रिप्शन टूलच्या मदतीने लपवले जाते. या कारणामुळे, यापर्यंत सामान्य सर्च इंजिनद्वारे पोहोचता येत नाही. डार्क वेबवरील वेबसाइटवर यूजरची माहिती एन्क्रिप्टेड असते, जी डिकोड करणे अशक्य असते.

ओनियन राऊटिंग टेक्नॉलॉजी डार्कवेब यूजर्सला ट्रॅकिंग आणि सर्विलान्सपासून वाचवते आणि त्यांची गोपनीयता राखण्यासाठी शेकडो ठिकाणी रूट आणि री-रूट करते. सोप्या शब्दात बोलायचे तर डार्क वेब असंख्य आयपी अ‍ॅड्रेसने कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते, ज्यामुळे तिला ट्रॅक करणे अशक्य होते. म्हणजे जर कोणी डार्क वेबचा वापर करून तुम्हाला मेसेज पाठवला, तर हे ओळखणे खुप कठिण आहे की तो मेसेज कोणी, कोणत्या डिव्हाईसवरून आणि कुठून पाठवला आहे.

इंग्लंडची संस्था एज्युकेशन फ्रॉम द नॅशनल क्राईम एजन्सीच्या वेबसाईटनुसार, जवळपास २५ लाख लोक दररोज टॉरचा वापर करतात. मात्र, टॉर हे डार्क वेब नाही. टॉर एक टूल अथवा ब्राऊझर आहे, ज्याद्वारे ओपन अथवा डार्क वेब ब्राऊझ करता येते.

डार्कवेबवर हजारो वेबसाईट्स

डार्क वेबवर किती वेबसाईट आहेत, याचा शोध घेणे शक्य नाही. एका अंदाजानुसार, २०२० .ओनियनवर सक्रिय टॉर साईटची संख्या ७६,३०० होती. डार्क वेबवर डील करण्यासाठी आता बिटकॉईन सारख्या क्रिप्‍टोकरन्सीचा वापर जास्त केला जातो, जेणेकरून टड्ढांजक्शन ट्रेस करता येऊ नये.

वैध-अवैध कामं होतात

डार्क वेब चुकीच्या कामांसाठी बदनाम झाले आहे. परंतु असे नाही की ये सर्वच कामे अवैध आहेत. काही लोक चांगल्या कामासाठी सुद्धा त्याचा वापर करतात, परंतु त्यांची संख्या खुप कमी आहे. डार्क वेबचा वापर बेकायदेशीर कामे करण्यासाठी जास्त होतो. येथे ऑनलाईन ड्रग्ज आणि शस्त्र विक्री भरपूर होते.

याशिवाय डार्क वेबचा वापर आर्थिक फसवणूक, लोकांची वैयक्तिक माहिती विकणे, चाईल्‍ड पोर्नोग्राफी, मानवी तस्करी, दहशतवादी संघटनांद्वारे धमकी देणे आणि एखाद्याची हत्या करण्यासाठ शूटर हायर करण्यासारख्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. अनेक सरकारे आपले नागरिक अथवा विरोधी पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यांची हेरगिरी करण्यासाठी याचा वापर करतात.

डार्क वेबचा वापर बेकायदेशीर आहे का?

टॉर अथवा डार्क वेबचा वापर करणे बेकायदेशीर नाही. जर तुम्ही वैध कामांसाठी याचा वापर करत असाल तर सरकारला कोणतीही अडचण नाही. याचा वापर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम करण्यासाठी करणे, जसे की चाईल्ड अ‍ॅब्यूज़, दहशतवाद वाढवणे, ड्रग्ज, शस्त्र खरेदी-विक्री इत्यादी.

डार्क वेब वापरणे सुरक्षित आहे का?

डार्क वेबचा वापर सामान्य माणसांनी टाळला पाहिजे. कारण जगातील भयंकर हॅकर्ससुद्धा डार्क वेबवर सक्रिय असतात. ते मिनिटात तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. याशिवाय येथे अनेक गुन्हेगारी कामे केली जातात, यासाठी केवळ उत्सुकता म्हणून डार्क वेबचा वापर करण्यात शहाणपणा नाही.

Related Posts