IMPIMP

Dr Babasaheb Ambedkar Jayanti | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय चित्रपट’ चित्रप्रदर्शन आयोजित

by nagesh
Dr. Babasaheb Ambedkar Jayant | Exhibition 'Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar and Indian Films' organized on behalf of Vanchit Bahujan Aghadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Dr Babasaheb Ambedkar Jayanti | महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त पुणे स्टेशन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी जयंती उत्सव आयोजित केला जातो. यंदा वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) वतीने याठिकाणी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय चित्रपट हे एकदिवसीय चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या चित्रप्रदर्शनात भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्या विविध चित्रपंटामध्ये डाॅ. बाबासाहेबांच्या विचारांचा, कार्याचा, प्रतिमेचा संदर्भ घेण्यात आलेला आहे त्या सर्व चित्रपटांची चित्रे व माहितीचे संकलन असलेले हे चित्रप्रदर्शन मोफत पाहण्याची सोय करण्यात आलेली आहे. (Dr Babasaheb Ambedkar Jayant)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रपटासारख्या सशक्त माध्यमात बाबासाहेबांचे चित्रण जितकं प्रेरणादायी आहे तितकंच या माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाचेही ते निदर्शक आहे. आणि हा स्वागतार्ह बदल नव्या पिढीला सांगितला पाहिजे, दाखवला पाहिजे या हेतूने हे चित्रप्रदर्शन करीत आहोत. सदर चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा व त्यामाध्यमातून लोकशाही मूल्यांची जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. या चित्रप्रदर्शनाची संकल्पना, संकलन व मांडणी मुंबईस्थित आनंद भंडारे यांची असून त्यांनी अतिशय कल्पकतेने साकारलेले हे चित्रप्रदर्शन समाजप्रबोधनासाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहे. आयोजन वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफूल्ल गुजर (Praful Gujar) व त्यांच्या सहका-यांनी केलेले आहे. (Dr Babasaheb Ambedkar Jayant)

 

प्रदर्शन तारीख व वेळ : दि. १४ एप्रिल २०२३ | सकाळी ९ ते रात्रौ १२ पर्यंत

 

ठिकाण : सेन्ट्रल हाॅटेलजळ, सेन्ट हेलेनाज शाळेसमोर, सोराबजी रोड, पुणे स्टेशन, पुणे.

 

 

Web Title :- Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | Exhibition ‘Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar and Indian Films’ organized on behalf of Vanchit Bahujan Aghadi

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील 329 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन

MLA Sanjay Gaikwad | ‘ठाकरे कुटुंबानं बालिशपणासारखी वक्तव्य करु नयेत’, आमदार संजय गायकवाड यांचा सल्ला

Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्यास अटक, 8 लाखाचे अंमली पदार्थ जप्त

NCP MP Supriya Sule | ‘आदित्य सुसंस्कृत मुलगा, ते खोटं बोलणार नाहीत’, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्याला सुप्रिया सुळेंचं समर्थन

 

Related Posts