IMPIMP

NCP MP Supriya Sule | ‘आदित्य सुसंस्कृत मुलगा, ते खोटं बोलणार नाहीत’, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्याला सुप्रिया सुळेंचं समर्थन

by nagesh
NCP MP Supriya Sule | ncp mp supriya sule reaction over aaditya thackeray statement on cm eknath shinde before revolt in shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यातच
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे
पुन्हा एकदा शिंदे-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP
Supriya Sule) यांनी आदित्य ठाकरे यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे. आदित्य कधी खोटं बोलत नाहीत, असे म्हणत सुप्रिया सुळे (NCP MP Supriya
Sule) यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद दौऱ्यावर असताना गीतम विद्यापीठाच्या (Geetham University) कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील (Shivsena) फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट (Maharashtra Politics News) केला. ते म्हणाले, शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर (Matoshree) आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करा अन्यथा ते आम्हाला जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

 

 

आदित्य सुसंस्कृत मुलगा

मी आदित्य ठाकरेंना जे काही ओळखते, त्यावरुन आदित्य ठाकरे साधा, सरळ आणि सुसंस्कृत मुलगा आहे. त्यांनी घरातील काही अनुभव सांगितला तर तो खराच असेल. तो सुसंस्कृत, चांगला मुलगा आहे, असं सांगत सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याला एक प्रकारे पाठिंबा दिला आहे.

 

 

आदित्य ठाकरे बालिश आहे – नारायण राणे

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना विचारले असता ते म्हणाले, मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आहे आदित्य ठाकरे? त्याला काय प्रतिष्ठा आहे? बालिश आहे तो. तुम्ही आता शाळेतल्या मुलांवरही प्रश्न विचारणार का? एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले नाही ते शिवसेना पक्ष घेऊ आले आहेत. शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी ही युती आहे. अशा प्रश्नांची तुम्ही का दखल घेताय मला कळत नाही. मी त्यांच्या मुद्यावर उत्तर देणार नाही. काहीही बोलतात ते. म्हणे रडले होते. कोणत्या वर्षी रडले होते? असा सवाल करत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या विधानावर बोलणं टाळलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  NCP MP Supriya Sule | ncp mp supriya sule reaction over aaditya thackeray statement on cm eknath shinde before revolt in shivsena

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘राष्ट्रहितासाठी राष्ट्रवादी भाजपसोबत येत असेल तर…’, भाजप मंत्र्यांचं मोठ विधान

TDM Marathi Movie | जब जिंदगी झंड होती है, तो पुना, बंबईही याद आती है…! ‘टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज (Video)

Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिकेतील 646 सेवकांच्या दि. 17 एप्रिलला होणार बदल्या

Gulabrao Patil | ‘तेच ते बोलून आम्हाला छळण्यापेक्षा नव्याने पक्ष बांधणी करा’, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

 

Related Posts