IMPIMP

Economy Growth By Yoga | योगाने सुधारतेय अर्थव्‍यवस्‍थेचे देखील आरोग्य… दरवर्षी होतेय वाढ, इतका वाढला उद्योग

by sachinsitapure

नवी दिल्ली : Economy Growth By Yoga | जगभरात २१ जून रोजी योग दिवस साजरा केला जातो. आरोग्य चांगले ठेवण्याचे हे माध्यम देशाच्या अर्थव्यवस्था सुद्धा निरोगी ठेवण्यासाठी मदत करत आहे. जेव्हापासून अंतरराष्ट्रीय योग दिवसाने जगाला शरीर आणि मेंदू निरोगी ठेवण्याचा फॉम्र्युला दिला आहे, तेव्हापासून या शास्त्राबाबत जागरुकता वाढली आहे, ज्यातून योगाशी संबंधीत उद्योग सुद्धा वाढत आहे.

योगाचा ट्रेड वाढवण्यात सर्वात जास्त योगदान अ‍ॅक्टिव वेअर, अक्सेसरीज, मॅट्स, क्लब्ज आणि योग सेंटर्सचे आहे. यांच्याद्वारे या व्यवसायाचा विस्तार झाला आहे. या दिवसामुळे जगभरात भारताची प्रतिमा खुपच ठळक झाली आहे. यातून अर्थव्यवस्थेचा वेग देखील वाढला आहे.

योगातून सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन!
योगाच्या व्यवसायात होत असलेल्या वाढीसंदर्भात ईएमआरचा एक रिपोर्ट आला आहे, ज्यात म्हटले आहे की, २०२४ पासून २०३२ च्या दरम्यान योगासंबंधी ग्लोबल मार्केट ९ टक्के वार्षिक दराने वाढू शकते. २०२३ मध्ये योगाच्या ग्लोबल मार्केटचा आकार सुमारे ११५.४३ अरब डॉलर होता, जो २०३२ पर्यंत वाढून २५०.७० अरब डॉलर होण्याचा अंदाज आहे. योग उद्योगात एक महत्वाची बाब ही सुद्धा आहे की, यातून सर्क्युलर इकॉनॉमीला सुद्धा चालना मिळत आहे, कारण मार्केटमध्ये योगासाठी वापरले जाणारे मॅट, कुशन, ब्लॉक, कपडे आणि इतर साहित्याची मागणी तर वाढली आहे परंतु अनेक कंपन्या हे साहित्या रिसायकल मटेरियलपासून बनवत आहेत.

योग प्रोफेशनल्समध्ये ७२% महिला
योगाचे आकर्षण वाढल्याने महिलांना मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी मिळात आहेत. आकड्यानुसार, जगभरात काम करत असलेल्या योग प्रोफेशनल्समध्ये ७२ टक्के महिला आहेत.

भारतातच योग क्लासेस इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू सुमारे २.६ अरब डॉलर आहे, तर योग इंडस्ट्रीचा आकार ८० अरब डॉलर आहे. कोविड-१९ नंतर तर यामध्ये १५४ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

यामध्ये महिलांसह योग सर्व प्रोफेशनल्ससाठी एक चांगला पर्याय ठरला आहे. योगद्वारे ऑफलाईन मार्केटसोबतच ऑनलाईन बाजाराला सुद्धा मोठा लाभ मिळत आहे. लोक योगा स्टूडियो, योगा क्लब आणि जिममध्ये सुद्धा योगाशी संबंधीत कोर्स करत आहेत, तर डिजिटल प्लॅटफॉम्र्सवर इन्फ्लूएन्सर्स सुद्धा ऑनलाईन योग क्लासेस देत आहेत.

Related Posts