IMPIMP

Electric Two Wheeler Loans | इलेक्ट्रिक कारवर लोन पेट्रोल मॉडेलपेक्षा स्वस्त, ई-स्कूटरवर जास्त व्याज, ई-वाहन लोनबाबतची ही माहिती उघडेल तुमचे डोळे

by sachinsitapure

नवी दिल्ली : Electric Two Wheeler Loans | पेट्रोल वाहनांप्रमाणे आता इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) सुद्धा लोनवर खरेदी करण्याची मागणी वाढत आहे. हे पाहता देशात प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरच्या अनेक बँका आणि नॉन-बॅकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन (एनबीएफसी) लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी लोन देत आहेत. बहुतांश बँका पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारवर जवळपास समान दराने इन्टरेस्ट रेट चार्ज करत आहेत, परंतु इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या (E-Two Wheelers) प्रकरणात यामध्ये मोठे अंतर दिसत आहे.

इलेक्ट्रिक कारवर लोनचे व्याजदर पेट्रोल कारच्या तुलनेत स्पर्धात्मक असतात आणि कधीकधी कमी सुद्धा असतात. मात्र, ई-स्कूटर आणि ई-बाईकच्या बाबतीत असे नाही. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या लोनवर व्याजदर ब्रँड आणि ग्राहकाच्या क्रेडिट प्रोफाईलच्या आधारावर बदलतात.

लोनवर कमी विकली जात आहेत इलेक्ट्रिक वाहन
इलेक्ट्रिक वाहनांना फायनान्स करण्याचा दर पेट्रोल वाहनांपेक्षा कमी आहे, म्हणजे बहुतांश लोक इलेक्ट्रिक वाहनांची पूर्ण किंमत भरून वाहन खरेदी करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ८०% पेक्षा जास्त पेट्रोलवर चालणारी दुचाकी वाहने फायनान्सवर खरेदी केली जात आहेत. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर फायनान्स १८ महिन्यांपूर्वी १५-२०% ने वाढून सध्या ४०-४५% पर्यंतपर्यंत पोहोचले आहे. तसेच, इलेक्ट्रिक बाईक-स्कूटरसाठी दिलेले ८०% लोन बँकांकडून येत आहे. अनेक बँका स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक कार्सच्या व्याजदरावर ०.२% ची सवलत सुद्धा देत आहेत.

इलेक्ट्रिक कारवर स्वस्त, बाईकवर महाग लोन
एका रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक कारवर लोन म्हणजे ग्रीन लोन पेट्रोल कारच्या तुलनेत ०.१% कमी आहे, यासाठी दर जवळपास सारखे आहेत. तर दुचाकी वाहनांवर लोनच्या बाबतीत बँका इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स लोनवर जास्त व्याजदर चार्ज करतात. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे मॉडेल आणि ब्रांडच्या आधारावर व्याजदरात १-४% पर्यत फरत असतो.

सध्या पेट्रोल आणि डिझेल प्रवाशी वाहनांसाठी लोन ९.३% ते १०.३% च्या दरम्यान व्याजदर आहेत, तर पेट्रोल दुचाकी वाहनांसाठी व्याजदर १६-२०% आहेत. इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्हीवर व्याजदर ८.५ ते ९.५% च्या दरम्यान आहेत, तर ई-दुचाकी वाहनावर दर १८ ते २२% पर्यंत आहे.

ई-वाहन फायनान्सवर बँकांचे व्याजदर
ईव्ही फायनान्समध्ये व्याजदर बँकांनुसार वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, इंडियन ओव्हरसीज बँक इलेक्ट्रिक फोर व्हिलर फायनान्स ८.७-१०.२% च्या व्याजदरावर करत आहेत, तर इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी ते ११% आहे. अशाप्रकारे श्रीराम फायनान्स इलेक्ट्रिक कमर्शियल आणि प्रवासी वाहनावर १२-१४% आणि इलेक्ट्रिक टू-व्हिलवर १२-१४% दराने व्याज घेते. तर एल अँड टी फायनान्समध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलर लोनवर व्याजदर ८.५-९.५% आहे.

Related Posts