IMPIMP

Fake website | बनावट ‘website’ कशी ओळखणार?, मुंबई पोलिसांनी दिले 4 महत्त्वाचे पॉइंट, जाणून घ्या

by nagesh
fake website how to identify fake websites mumbai police give 4 tips

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागला. यामुळे सर्व व्यवहार बंद झाले. ऑफलाईन ऐवजी ऑनलाईनला (Online) प्राधान्य देण्यात आली. मात्र यामुळे अनेक फसवणुकीचे (Fraud) प्रकरण वाढली गेली. यामुळे अनेक मेसेज येत तरुणांना पैशाचा गंडा घातला जात आहे. याचबरोबर आता दुसऱ्या एका बनावट वेबसाईटवरून (Fake website) देखील लोकांना केवळ फसवण्याचा काम सुरु आहे. अनेक आकर्षक जाहिराती त्यावर खास डिस्काउंट सांगून यावरून ग्राहकांची फसवणूक होते. बनावट वेबसाइटवरून (Fake website) होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 4 महत्त्वाचे पॉइंट (4 important points) दिलेत. जेणेकरून फसवणूक होण्यापासून ग्राहक बचाऊ शकेल. तसेच, बनावट साईट ओळखणे हे अगदी सोपं आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

याबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अधिक दखल घेत त्यांनी सर्व ग्राहकांना सूचना केल्या आहेत. पोलीस म्हणतात संकेतस्थळ बनावट असल्याचे हे काही चिन्ह (पॉइंट) आहेत. आकर्षक ‘ऑफर’ (Offer) ला बळी न पडता संकेतस्थळ तेच अर्थात खरे असल्याची खात्री करून घ्या. काही संशय वाटल्यास आम्हाला कळवा.

 

दरम्यान, अनेकवेळा मोठ्या ब्रँड्सच्या प्रमाणे दिसणाऱ्या अथवा स्पेलिंगमध्ये लगेच लक्षात येणारे असे बदल
करून ग्राहकांची मोठी फसवणूक होते. तसेच, खरी साइट आणि बनावट वेबसाइट कशी ओळखायची
असा सवाल देखील समोर उपस्थित होतो. तर, बनावट ई-कॉमर्स वेबसाइटमध्ये (Fake e-commerce
website) पुढील 4 गोष्टी अथवा यापैकी एखादी गोष्ट आढळत नाही. असं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितलं आहे. ते 4 महत्त्वाचे पॉइंट बघा.

1 – रिफंड अथवा रिटर्न पॉलिसी किंवा त्याची कोणतीही माहिती अशा साइटवर नसते.

2 – ग्राहक सेवा क्रमांक नसतो.

3 – शंका निर्माण होती अशा ऑफर्स

4 – आवश्यक नसता देखील अधिकची माहिती मागितलेली असते.

 

Web Title : fake website how to identify fake websites mumbai police give 4 tips

 

Related Posts