IMPIMP

Finger Found In Ice Cream In Mumbai | आईस्क्रीममध्ये मानवी बोट, उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDA चा दणका

by sachinsitapure

इंदापूर: Finger Found In Ice Cream In Mumbai | मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन मागवला होता. त्यानंतर या महिलेला आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. यानंतर घाबरलेल्या महिलेने मालाड पोलीस ठाणे (Malad Police Station) गाठले. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम (Yummo Ice Creams) कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवलं आहे. दरम्यान या प्रकारामुळे इंदापूर येथील फॉर्च्युन कंपनीचे (Fortune Dairy In Indapur) उत्पादन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र डेअरी सील करण्यात आलेली नाही.

गाजियाबाद येथील ही कंपनी जयपूर लक्ष्मी डेअरी व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमधील फॉर्च्युन डेअरीकडून आईस्क्रीम बनवून घेत होती अशी माहिती समोर आली आहे.

डेअरीचे भागीदार व संचालक सचिन जाधव म्हणाले, “फॉर्च्युन डेअरी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन करते. दुधापासून भुकटी व बटर बनविण्यात येते. १६ सप्टेंबर २०२३ पासून आमची कंपनी यम्मो कंपनीचे आईस्क्रीम बनविण्याचे काम करत आहे. ती कंपनी गाजियाबाद येथून हे आईस्क्रीम बनवून घेते. सदर कंपनीवर १२ जून २०२४ रोजी तक्रार झाली आहे.”

यम्मो कंपनी इंदापूर, गाजियाबाद आणि पुणे येथील कंपनीतून आईस्क्रीम घेते. आईस्क्रीमध्ये बोट कुठल्या कंपनीतील आईस्क्रीमध्ये सापडलं ते अद्याप समोर आलेलं नाही. मालाड पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार आहे.

Related Posts