IMPIMP

Firing On Sarpanch In Beed | बीड हादरलं! सरपंचाची गोळ्या घालून हत्या; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure

बीड : Firing On Sarpanch In Beed | बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये गोळीबार झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीड मधील राजकीय वातावरण चांगलेच तणावाचे आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी असलेल्या व्यक्तीवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोळीबारानंतर त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडमधील परळीत शनिवारी रात्री गोळीबार झाला. यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झाले आहेत. तर ग्यानबा गित्ते जखमी झाले आहेत. शहरातील बँक कॉलनीतील ही घटना आहे. सध्या जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. सध्या ते परळीत ठाण मांडून आहेत.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचं एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.

Related Posts