IMPIMP

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

by sachinsitapure

नवी दिल्ली : Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेसह देशातील चार मोठ्या बँकांनी १ जुलैपासून फिक्स डिपॉझीटच्या व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही सुद्धा एचडीएफसी आणि अ‍ॅक्सीस बँकेचे ग्राहक असाल तर एफडी करण्यापूर्वी नवीन व्याजदरांबाबत आवश्य जाणून घ्या.

एक वर्षाच्या एफडीवर एचडीएफसी बँक ६.६० टक्के व्याज देत आहे. तर तर अ‍ॅक्सीस बँक ६.७० टक्के व्याज देत आहे. इतर बँकांमध्ये आयसीआयसीआय आणि एसबीआय एक वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे ६.७० टक्के आणि ६.८ टक्के व्याज देत आहेत.

२ वर्षाच्या एफडीवर किती व्याज?
एचडीएफसी ७ टक्के
अ‍ॅक्सीस बँक ७.१० टक्के
आयसीआयसीआय ७.२० टक्के
एसबीआय ७ टक्के

३ वर्षाच्या एफडीवर किती व्याज?
एचडीएफसी ७ टक्के
अ‍ॅक्सीस बँक ७.१० टक्के
आयसीआयसीआय ७ टक्के
एसबीआय ६.७५ टक्के

बँक ऑफ इंडियाने ३० जून २०२४ पासून एफडी व्याजदरात केलेल्या बदलानुसार, ज्येष्ठ नागरिकांना ६६६ दिवसांसाठी ७.८०% व्याज देत आहे. इतरांसाठी कमाल ७.३% टक्के व्याज देत आहे.

पंजाब अँड सिंध बँकेने १ जुलै २०२४ पासून एफडी व्याजदरात केलेल्या बदलानुसार, ६६६ दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठांना ७.८०% व्याज मिळत आहे. इतरांना या कालावधीसाठी ७.३% टक्के व्याज मिळत आहे.

Related Posts