IMPIMP

Flour For Summer Season | उन्हाळ्यात पोटात थंडावा वाढवण्यासाठी सेवन करा ‘या’ 4 पिठाची भाकरी, पचन राहील ‘फिट’ आणि आरोग्य राहील ‘तंदुरुस्त’

by nagesh
Flour For Summer Season | healthy flour for summers types of flours to include in diet during summer season

सरकारसत्ता ऑनलाइन – Flour For Summer Season | ज्याप्रमाणे हिवाळ्यात गरम अन्न सेवन करणे फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात थंड चवीच्या पदार्थांना महत्त्व दिले पाहिजे. जेणेकरून उन्हाळ्यात शरीर थंड ठेवता येईल, पोटातील उष्णता शांत करता येईल. उन्हाळ्यात, लोक शरीर थंड ठेवण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ खातात, परंतु चपाती किंवा भाकरी हा असा आहार आहे की प्रत्येकजण दिवसातून 1 किंवा 2 वेळा खातो (Food Guide For Summer). हिवाळ्यात नाचणी, बाजरी इत्यादीपासून बनवलेल्या भाकरीचे सेवन करतात. पण उन्हाळ्यात पीठ बदलावे लागते (Flour For Summer Season).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. गव्हाचे पीठ (Wheat Flour)

आता उन्हाळा आला आहे, तुम्ही तुमच्या आहारात गव्हाच्या चपातीचा समावेश करू शकता. गव्हाचा कूलिंग इफेक्ट (Cooling Effect) असतो, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन करता येते.

 

गव्हाच्या पिठात भरपूर पोषक तत्व (Nutrients) असतात. गव्हाचा कोंडा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. गव्हाचे गुणधर्म रक्त शुद्ध करतात. गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. थायरॉईडच्या रुग्णांसाठीही गव्हाचे पीठ फायदेशीर आहे.

 

2. चण्याचे पीठ (Gram Flour)

उन्हाळ्यात बेसनपासून बनवलेल्या चपातीही खाता येते. चण्याच्या पिठाचा कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी योग्य असते. चण्याच्या पिठात प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. 1 कप बेसनामध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रोटीन असतात. चण्याचे पीठ स्नायू तयार करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

 

बहुतेक लोक चन्याच्या पीठाला बसेन समजतात, पण चन्याचे पीठ आणि बेसन हे वेगवेगळे आहे. बेसन रिफाईंड केले जाते, त्यातील सर्व फायबर काढून टाकतात. तर चनापीठ हे चण्याच्या सालीसह दळलेले असते, जाड असते आणि फायबरयुक्त (Fiber Rich Food) असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. बार्लीचे पीठ (Barley Flour)

उन्हाळ्यात बहुतेक लोक पोट थंड ठेवण्यासाठी बार्लीचे पाणी पितात. यासाठी तुम्ही बार्ली बारीक करून त्याचे पीठ तयार करू शकता, उन्हाळ्यात तुम्ही त्यापासून रोट्या बनवू शकता. उन्हाळ्यात बार्ली फायदेशीर मानली जाते कारण त्याचा थंड प्रभाव असतो.

 

याशिवाय बार्लीमध्ये भरपूर पोषकतत्व असतात. जवाच्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
बार्ली थंड आहे, त्यामुळे ती उन्हामुळे होणार्‍या मुरुम- फुटकुळ्यांपासून देखील संरक्षण करते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही बार्लीची भाकरी चांगली फायदेशीर आहे (Flour For Summer Season).

 

4. ज्वारीचे पीठ (Sorghum Flour)

ज्वारीमध्ये पोषक घटक असतात.
ज्वारीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि खनिजे (Protein, Vitamin B Complex And Minerals) भरपूर प्रमाणात असतात.
याशिवाय ज्वारीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह (Potassium, Phosphorus, Calcium And Iron) असते.
ज्वारीचा प्रभाव थंडावा देणारा असतो, त्यामुळे पित्त प्रकृतीचे लोकही त्याच्या भाकरी खाऊ शकतात.

 

वात असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.
उन्हाळ्यात ज्वारीचे पीठ पित्त आणि कफ शांत करते.
ज्वारीमध्ये कॅलरी कमी आणि पोषण जास्त असते.
यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ज्वारीच्या पिठाच्या भाकरी खाल्ल्याने थकवा दूर होतो आणि शरीराला शक्ती मिळते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Flour For Summer Season | healthy flour for summers types of flours to include in diet during summer season

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ganesh Naik | अटक टाळण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईकांनी उचललं हे पाऊल !

Figs Benefits | अंजीर खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

Pune Crime | कंपनीला माल सप्लाय करण्यासाठी खंडणीची मागणी ! गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडून खंडणीबहाद्दरांच्या म्होरक्यासह तिघांना अटक

 

Related Posts