IMPIMP

Food Service Market | 6 वर्षात फूड सर्व्हिस मार्केटमध्ये येईल दुप्पट उसळी, भारतात ट्रेंड करतेय हे मार्केट

by sachinsitapure

नवी दिल्ली : Food Service Market | घरी जेवण बनविण्याची इच्छा नसेल तर आपण ताबडतोब ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. मागील काही वर्षात भारतात फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. फूड सर्व्हिस मार्केटच्या वाढीबाबत फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) आणि बेन अँड कंपनी (Bain & Company) ने एक रिपोर्ट जारी केला आहे.

या रिपोर्टनुसार, चालू दशकाच्या अखेरीस फूड सर्व्हिस मार्केट ९ ट्रिलियन रुपयांपर्यत पोहोचल. सध्या हे मार्केट ५.५ ट्रिलियन रुपये आहे. ९ ट्रिलियन रुपयांपर्यंत मार्केट पोहोचण्यास वार्षिक १८ टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सध्या फूड सर्व्हिस मार्केटचे योगदान ८ टक्के आहे जे २०३० पर्यंत २० टक्केपर्यंत पोहोचू शकते. कस्टमर बेस आणि कंझम्पशन संधीसोबतच आऊटलेट्सच्या संख्येत वाढीमुळे मार्केटमध्ये तेजी येण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोविड महामारीनंतर या सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे.

भारतात या बाजाराचा भरपूर ट्रेंड आहे. जास्त इन्कम, डिजिटायजेशन, चांगला कस्टमर एक्सप्रियन्स यामुळे यामध्ये वाढ होऊ शकते. आगामी वर्षांमध्ये या ट्रेंडमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Related Posts