IMPIMP

Former MLA Mohan Joshi | ‘5 वर्षाच्या कारभारात पुणे गेले खड्ड्यात; भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी’ – मोहन जोशी

by nagesh
Former MLA Mohan Joshi | After 5 years in office, Pune went to the pits; BJP delegation's visit is a mere stunt - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Former MLA Mohan Joshi | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि भाजप यांच्यात सतत आरोपांच्या फैरी झडत असतात. त्यातच स्थानिक राजकारणात देखील मोठ्या प्रमाणात टीका टीपणी होताना दिसत आहे. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. ‘भाजपच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेचा कारभार ढासळला आणि जाता जाता रस्ते खोदाई करून भाजपने पुणे शहर (Pune City) अक्षरशः खड्ड्यात घातले,’ असं मोहन जोशी यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील वर्ष, सव्वा वर्ष झाली शहराच्या मध्यवस्तीत रस्ता खोदाईची कामे चालू आहेत. या कामांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून रहिवासी आणि दुकानदार वैतागले आहेत. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने व्हावीत, अशा मागणीचे निवेदन मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी आज पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना दिले.

 

मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ”नवीन जलवाहिनी टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे अशा विकास कामांना काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. पण, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने 5 वर्ष ठोस कामे केली नाहीत आणि निवडणुका जवळ येताच घाईत काम सुरू केली. त्यामुळे रस्ते खोदले गेले पण नियोजन नसल्याने कामे लांबत गेली, खोदाईनंतर रस्त्यांची डागडुजी अशास्त्रीय आणि निकृष्ट पद्धतीने केली जातेय. काही ठिकाणी अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा काँक्रीटचा अशी अवस्था झालीय. सततच्या खोदकामामुळे वातावरणात धूळ पसरून रहिवासी, दुकानदार यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, पुढे त्यामध्ये म्हटलं आहे, ”महापालिकेच्या कामांबद्दल तक्रार करणारे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना नुकतेच दिले.
हा प्रकार निव्वळ स्टंटबाजीचा आहे. 15 मार्च 2022 पर्यंत भाजपची सत्ता होती.
त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात उदासिनता दाखविली आणि आता सत्ता गेल्यावर विकासकामे लवकर व्हावीत याची आठवण भाजपला झाली,
हा ढोंगीपणा पुणेकरांच्या लक्षात आलेय. मुळा मुठा नदी सुधारणा, समान पाणी पुरवठा,
रस्ते दुरुस्ती अशा कोणत्याच मोठ्या प्रकल्पातही भाजपला कार्यक्षम दाखविता आलेली नाही,” असा आरोप त्यांनी केला.

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | After 5 years in office, Pune went to the pits; BJP delegation’s visit is a mere stunt – Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या

BJP-MNS Alliance | पुण्यात भाजप आणि मनसे युतीचं वारं ?; चर्चेला उधाण

Multibagger Penny Stock | कवडी इतकी होती किंमत, आता 1400 च्या पुढे… 500 रुपये लावणारे सुद्धा बनले लखपती

 

Related Posts