IMPIMP

FPI Investment | NDA सरकार आल्यानंतर पुन्हा परदेशी गुंतवणुकदारांचा बदलला मूड, जूनमध्ये लावले सर्वात जास्त पैसे, का वाढला विश्वास?

by sachinsitapure

नवी दिल्ली : FPI Investment | निवडणुकीदरम्यान घाबरलेल्या परदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास नवीन सरकार (NDA Modi Govt) स्थापन होताच परतला आहे. जूनच्या आकड्यावरून हे दिसून येत आहे. या काळात परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी (FII) २०२४ मध्ये दुसऱ्यांदा सर्वात जास्त गुंतवणूक केली आहे. यापूर्वी मार्चमध्ये परदेशी गुंतवणुकदारांनी जास्त गुंतवणूक केली होती. निवडणूक काळात लागोपाठ दोन महिने परदेशी गुंतवणुकदारांनी बाजारातून हजारो कोटी रुपये काढले.

जूनमध्ये परदेशी गुंतवणुकदारांनी ३.२ अरब डॉलर (सुमारे २६ हजार कोटी रुपये) ची गुंतवणूक भारतीय बाजारात केली. यापूर्वी मार्चमध्ये ४.२ अरब डॉलर (सुमारे ३४ हजार कोटी) ची सर्वात जास्त गुंतवणूक आली होती. लोकसभा निवडणूक काळात परदेशी गुंतवणुकदारांनी एप्रिलमध्ये १.०४ अरब डॉलर (सुमारे ८,४०० कोटी रुपये) आणि मेमध्ये ३.१ अरब डॉलर (सुमारे २५ हजार कोटी रुपये) भारतीय बाजारातून काढून घेतले होते.

निफ्टी ११ टक्के वाढला

जूनमध्ये सेन्सेक्‍स आणि निफ्टीने नवीन विक्रम केला आहे. निफ्टीने २०२४ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यातच ११ टक्केचा जबरदस्‍त रिटर्न दिला आहे. सेन्सेक्‍स आणि निफ्टी दोघांनीही जूनमध्ये सुमारे ७ टक्के उसळी नोंदवली आहे. जून तिमाहीत सुद्धा दोन्ही इंडेक्‍सच्या ७.३ टक्के रिटर्न होता.

मिडकॅप आणि स्‍मॉलकॅपची दमदार कामगिरी

बीएसई मिडकॅप आणि स्‍मॉलकॅपने सुद्धा बाजारात चांगली कामगिरी केली. मिडकॅपने जूनमध्ये ७.७ टक्के रिटर्न दिला तर स्‍मॉलकॅप सुद्धा १०.८ टक्के वाढले आहे. जून तिमाहीच्या आकड्यानुसार, मिडकॅपला १७ टक्के आणि स्‍मॉलकॅपला २१ टक्के रिटर्न मिळाला आहे.

जुलैमध्ये नेहमी राहिली आहे तेजी

बाजार सध्या बुलिश आहे, कारण भारतीय अर्थव्‍यवस्‍थेचा विकास दर आणि महागाई नियंत्रणात आहे आणि गुंतवणुकदारांना यातून विश्वास मिळतो.

Related Posts