IMPIMP

Gautam Adani | गौतम अदानींची भूतानमध्ये एंट्री… ग्रीन हायड्रो प्‍लांटसाठी मोठी डील! तेथील राजा आणि PM ला भेटले

by sachinsitapure

नवी दिल्ली : Gautam Adani | पंतप्रधान नरेंद मोदी यांचे निकटवर्तीय उद्योजक गौतम अदानी यांनी रविवारी थिम्‍पूमध्ये भूतानचे राजा जिग्‍मे खेसर नामग्‍याल वांगचुक आणि तेथील पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी भूतानमध्ये ५७० मेगावॅट ग्रीन हायड्रो प्लांट लावण्याच्या करारावर हस्ताक्षर करण्याची घोषणा केली.

याशिवाय, गौतम अदानी यांनी भूतानमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासात सहकार्य करण्याबाबत देखील चर्चा केली. गौतम अदानी यांनी याबाबतची माहिती एक्सवर देताना म्हटले की, भूतानचे माननीय पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांच्यासोबत भेट खुपच रोमांचक होती. चुखा राजयात ५७० मेगावॅटच्या हरित हायड्रो प्लांटसाठी ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे.

गौतम अदानी यांनी सांगितले की, भूतानसाठी त्यांचे व्हिजन आणि मोठे कॉम्प्युटिंग सेंटर व डेटा फॅसिलिटीसह गेलेफू माइंडफुलनेस सिटीच्या इको फ्रेंडली मास्‍टरप्‍लानने प्रोत्साहित झालो आहे. अदानी ग्रुप भूतानमध्ये हायड्रो प्‍लांट लावण्यासह येथे इतर इन्फ्रा प्रोजेक्‍टवर मिळून करण्यासाठी उत्‍सुक आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. गौतम अदानी यांनी म्हटले की, इको फ्रेंडली देशासाठी ग्रीन एनर्जी मॅनेंजमेंटसह या प्रोजेक्‍टमध्ये सहकार्यासाठी उत्साहित आहे.

Related Posts