IMPIMP

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | Gold rate fell by Rs 1,000 and silver also fell know gold silver rate today in india 26 november 2021

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Update | सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी (29 September) सोन्याच्या किमतीत 132 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. या तेजीनंतर बुधवारी सोने 46089 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर मंगळवारी सोने 45957 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. तर चांदीच्या किमतीत 368 रुपये प्रति किलोची वाढ नोंदली गेली. या वाढीसह चांदी 59996 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली जी मंगळवारी 59628 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर होती. (Gold Price Update)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी स्वस्त

सोने आजही आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 10111 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्टमध्ये
गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचले होते. (Gold Price Update)

मागील काही दिवसात स्थानिक बाजारात सोने घसरून 45 हजार रुपयांच्या खाली गेले होते. तर यावर्षी 1 जानेवारीला सोने 50,300 रुपयांवर होते. तर
चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19984 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति
किलो आहे.

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1739 डॉलर प्रति औंस आणि चांदी स्थिर भावाने 22.26 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. दोन्हीच्या किमतीत वाढ होऊनही खरेदीसाठी हा योग्य काळ आहे कारण काही दिवसांपूर्वीच किमती खुप कमी झाल्या आहेत. त्या हिशोबाने अजून जास्त वाढ झालेली नाही.

 

Web Title : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 30th september know latest rate indian sarafa market

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

Virginity | ‘व्हर्जिनिटी’ (कौमार्य) गमावण्याला दिले गेले नवीन नाव, जगात सुरू झाली ‘चर्चा’ !

Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

 

Related Posts