IMPIMP

Jobs : 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती

by nagesh
government jobs india post recruitment 2021 recruitment 2428 posts maharashtra circle post deadline filing

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी (Government jobs) करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. या पदांसाठी कोणतीही परीक्षा, किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी (Government jobs) करण्याची संधी चालून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता इच्छूक उमेदवार 10 जूनपर्यंत अर्ज करु शकतात.

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या 2428 पदांची भरती होत आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदत यापूर्वी दोनवेळा वाढवण्यात आली होती. त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता आला नव्हता त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मोठी संधी आहे.

महत्त्वाच्या तारखा
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 27 एप्रिलपासून सुरु झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीत कमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे.

पदांची संख्या
पोस्टाच्या या भरतीप्रक्रियेमधून महाराष्ट्रात एकूण 2 हजार 428 जागा भरल्या जाणार आहेत.

वेतन
पात्र उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

वयाची अट
अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी 18 ते अधिकाधिक 40 वर्षे असणे बंधनकारक आहे.

अशी होणार भरती
GDS पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही 10 वी मधील गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://appost.in/gdsonline/Home.aspx

Also Read:- 

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

Related Posts