IMPIMP

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची ‘स्कीम’ ! 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या

by nagesh
Post Office Scheme | these five schemes of post office which get the highest return double the money in a few years

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gram Suraksha Yojana | जर तुम्ही कमी जोखमीचे रिटर्न किंवा गुंतवणुक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची एक स्कीम उपयोगी पडू शकते. भारतीय पोस्ट (Indian Post) द्वारे देण्यात येणारी ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) एक असा पर्याय आहे ज्यामध्ये कमी जोखीममध्ये चांगला रिटर्न मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत बोनससह ठराविक रक्कम 80 वर्षाच्या वयात किंवा मृत्यूच्या स्थितीत कायदेशीर वारस नामित व्यक्तीला, जेसुद्धा अगोदर असेल ते मिळेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

नियम आणि अटी –

19 ते 55 वर्ष वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. किमान विमा रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता.
प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक करू शकता.

प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट आहे.
पॉलिसी कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडल्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियमचे पेमेंट करू शकतो. (Gram Suraksha Yojana)

कर्ज मिळते –

ही विमा योजना कर्ज सुविधेसोबत येते, ज्याचा लाभ पॉलिसीधारकाला चार वर्षानंतर मिळतो.

सरेंडर करू शकता पॉलिसी –

ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी कोणताही लाभ मिळणार नाही.
पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्टद्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति 1,000 रुपये आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मॅच्युरिटी बेनेफिट –

जर कुणी 19 वर्षाच्या वयात 10 लाखाची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये असेल.
पॉलिसी खरेदाराला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. 60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल.

येथे मिळेल सर्व माहिती –

नामांकित व्यक्तीचे नाव किंवा इतर माहिती जसे ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरमध्ये कोणत्याही अपडेच्या बाबतीत, ग्राहक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊ शकतो.
इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेली टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क करू शकतो.

 

Web Title : Gram Suraksha Yojana | post office scheme 1500 rupees monthly deposit and get 35 lakh rupees

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांकडून चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस, माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई; दिला इशारा

Air India Deal | टाटा सन्सने 18000 कोटीमध्ये एयर इंडियाची डील जिंकली, मंत्रिगटाने अखेर केले मान्य

Pune Crime | पुणे महापालिकेच्या कचरा गाडीला मागून धडकून स्विफ्ट कार चालकाचा मृत्यू

 

Related Posts