IMPIMP

Guavas Benefits | वजन कमी करा, खोकला-सर्दीपासून बचाव करा, थंडीमध्ये पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत असंख्य फायदे

by nagesh
Blood Sugar Level | blood sugar has increased fruits for diabetes eating guava can be beneficial you should know

सरकारसत्ता ऑनलाइन टीम  : हिवाळ्यात पेरू (Guavas Benefits) जवळपास प्रत्येकाला खायला आवडतात. पेरूसह त्याची पानेसुद्धा खुप लाभदायक असतात. पेरूमध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि भरपूर फायबर (Guavas Benefits) असते. याशिवाय, यामध्ये फोलेट आणि लायकोपीन सारखी महत्वाची पोषकतत्त्व सुद्धा आढळतात.

पेरूत 80% पर्यंत पाणी असते जे त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. हिवाळ्यात पेरू खाण्याने शरीराला आणखी काय-काय फायदे (Guavas benefits) मिळतात ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1. सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो –

पेरू आणि त्याच्या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि आयर्न असते. याच्या सेवनाने सर्दी, खोकला दूर राहतो, इम्युनिटी वाढते, कफ कमी होतो, दृष्टी चांगली होते.

 

 

2. डायबिटीजपासून बचाव होतो –

पेरू (Guavas Benefits) आणि त्याची सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रित होण्यास मदत होते. पेरूच्या पाण्यात इन्सुलिन रेजिस्टन्स असते. पेरूच्या
पानांचा चहा प्यायल्यास ब्लड शुगर कमी होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

3. हृदयाचे आजार दूर राहतील –

पेरूतील अँटीऑक्सिडेंट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन हृदयाला फ्री रेडिकल्सपासून खराब होण्यापासून वाचवते. पेरूची पाने सुद्धा ब्लड प्रेशर कमी
करतात, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. जेवणापूर्वी एक पिकलेला पेरू खाल्ल्याने ब्लड प्रेशर 8-9 पॉईंटपर्यंत कमी होते.

 

 

4. वजन कमी करण्यात उपयोगी –

पेरूत कॅलरीची मात्रा खुप कमी असते. पोट जास्त वेळ भरलेले राहिल्याने वजन कमी होते. शुगरची मात्रा खुप कमी असते. यामुळे वजन कमी होते.

 

 

5. बद्धकोष्ठता दूर होते –

पेरू फायबरचा चांगला स्त्रोत आहे आणि त्याचे बी पोट स्वच्छ करते. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पेरूची पाने सेवन केल्यास
डायरियाची समस्या दूर होते. आतड्यातील हानिकारक विषाणू मरतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

6. कॅन्सरपासून होऊ शकतो बचाव –

पेरूच्या पानांमध्ये अँटीकॅन्सर गुण असतात. टेस्ट-ट्यूब आणि अ‍ॅनिमल स्टडीजनुसार, पेरूचा अर्क कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखतो. पेरूमध्ये आढळणारे शक्तीशाली अँंटीऑक्सिडेंट फ्री रेडिकल्सपासून वाचवते.

यामध्ये आढळणारे लायकोपीन, क्वेरसेटिन आणि पॉलीफेनोल्स सुद्धा कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखण्यात लाभदायक असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. संशोधनातून हे सुद्धा समजते की, पेरूच्या पानांच्या तेलात अँटी-प्रोलिफेरेटिव्ह पदार्थ असतात जे कॅन्सरचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी असतात. (Guavas Benefits)

 

Web Title: Guavas Benefits | guava or amrood benefits in marathi winter fruits nutrients

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

Gold Silver Price Today | सोने पोहचले 50 हजार रुपयांच्या जवळ, जाणून घ्या चांदीत आज किती आली तेजी?

 

Related Posts