IMPIMP

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

by nagesh
Petrol Diesel Price Hike | petrol diesel prices hike by 75 paisa per liter in pune

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सतत वाढणाऱ्या इंधन दरात केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलवरील करामध्ये कपात (Petrol-Diesel Price Cut) नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. इतकच नाही तर सर्व राज्यांना व्हॅटमध्ये (Vat) सात रुपयाची कपात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी त्याच रात्री तसेच एक दोन दिवसात व्हॅट कमी करत जनतेला दिलासा दिला होता. तर दुसरीकडे व्हॅट कमी करण्यास महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश सारख्या राज्यांनी नकार दिला होता. नकार देणाऱ्या राज्यांमध्ये सर्वाधिक इंधन असणाऱ्या राजस्थानचाही समावेश होता. मात्र, आता गेहलोत सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेत राजस्थानमधील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार पेट्रोलवर ४ रुपये आणि डिझेलवर ५ रुपयांनी व्हॅट कमी (Petrol-Diesel Price Cut) केला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून याची माहिती दिली, तसेच या निर्णयामुळे सरकारला ३५०० कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत उशिरा का होईना तोटा सहन करत गेहलोत सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही महाराष्ट्रच नाही तर बिगर भाजपा सरकारे व्हॅट कमी करणार नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रानेच आणखी कर कमी करावेत अशी मागणी केली जात आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारचा जीएसटी वाटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पंढरपूरात एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यांनी त्यावेळीही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी होणार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान महाराष्ट्राचे शेजारी असणाऱ्या गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर खूप कमी (Petrol-Diesel Price Cut) आहेत. कर्नाटकमध्ये तर महाराष्ट्रापेक्षा कमी दर, असे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात इंधन दर कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Petrol-Diesel Price Cut | vat petrol and diesel reduced congress ruled rajasthan when maharashtra

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

Gold Silver Price Today | सोने पोहचले 50 हजार रुपयांच्या जवळ, जाणून घ्या चांदीत आज किती आली तेजी?

Manika Batra | ऑलिम्पियन मनिका बत्राला उच्च न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’; म्हणाले – ‘खेळाडूंना नाहक त्रास नको’

 

Related Posts