IMPIMP

Hair Care Tips | पांढर्‍या आणि गळणार्‍या केसांमुळे त्रस्त आहात का, मग घरातच तयार करा ‘हे’ 2 हेअर ऑईल

by nagesh
Hair Care Tips | oils for white hair and baldness treatment curry leaves coconut nigella kalongi ka tel strong scalp

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Hair Care Tips | सध्याच्या युगात केसांच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. लहान मुले, म्हातारे, तरुण, स्त्रिया, पुरुष असे सर्वजण पांढर्‍या, गळणार्‍या आणि पातळ केसांवर उपाय शोधण्यात व्यस्त आहेत, परंतु सर्व प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही केवळ महागड्या उत्पादनांचाच वापर केला पाहिजे असे नाही, तर आजीच्या काळातील काही टिप्सही तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात. केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका करणारे घरगुती तेल कसे बनवायचे ते जाणून घेवूया. (Hair Care Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काळे तिळ तेल
काळ्या तिळाच्या तेलात अँटी माइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात, त्यामुळे केसगळतीची समस्या भेडसावणारे लोक हे तेल वापरू शकतात. ते केसांची मुळे मजबूत करते, केस गळणे कमी करते आणि कोंड्याच्या समस्येपासून देखील मुक्त होतात. ज्यांच्या केसांची वाढ मंदावली आहे त्यांच्यासाठी हे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. (Hair Care Tips)

 

काळे तिळ तेल कसे तयार करावे?

सर्वप्रथम 100 ग्रॅम काळे तिळ घ्या आणि एक लिटर पाण्यात मिसळा.
आता हे मिश्रण गॅसवर उकळायला ठेवा.
उकळल्यानंतर पाणी अर्धे झाले की गॅस बंद करा.
थंड झाल्यावर त्यात एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल टाका.
आता हे मिश्रण सुती कापडाने गाळून बाटलीमध्ये भरा.
हे तेल केसांना आणि स्कॅल्पला चांगले लावा.
साधारण 2 तासांनी केस शॅम्पूने धुवा.

 

कढीपत्ता तेल
सहसा दक्षिण भारतीय रेसिपीसाठी कढीपत्ता वापरला जातो. परंतु हे जाणून आश्चर्य वाटेल की ते केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि अमीनो अ‍ॅसिड आढळते. यामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि केसांचा पातळपणा दूर होतो. या पानांमध्ये असलेले प्रोटॉन आणि बीटा कॅरोटीन केसांच्या वाढीस मदत करतात. ज्यांच्या डोक्यावर लहान वयात केस पांढरे होतात त्यांच्यासाठी कढीपत्ता तेल खूप फायदेशीर ठरू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कढीपत्ता तेल कसे तयार करावे?

प्रथम मूठभर कढीपत्ता घ्या आणि उन्हात वाळवा
नंतर एका भांड्यात खोबरेल तेलात ही कोरडी पाने टाका आणि गरम करा
हे तेल थंड झाल्यावर सुती कापडाने गाळून कुपीमध्ये साठवावे
हे तेल केस आणि स्कॅल्पवर चांगले लावा आणि नंतर 2 ते 3 तासांसाठी सोडा
शेवटी, शॅम्पूने केस स्वच्छ करा

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care Tips | oils for white hair and baldness treatment curry leaves coconut nigella kalongi ka tel strong scalp

 

हे देखील वाचा :

Vitamin B6 Rich Foods | Vitamin B6 च्या कमतरतेमुळे होऊ शकतात Cancer सारखे जीवघेणे आजार, बचावासाठी खा ‘हे’ 4 Foods

Tea Side Effects | High Blood Pressure च्या रूग्णांसाठी नुकसानकारक आहे या मसाल्याचा चहा, Avoid करणे चांगले

Teeth Health | दातांच्या शत्रू आहेत ‘या’ खाण्या-पिण्याच्या 5 वस्तू, आजपासून व्हा त्यापासून दूर

 

Related Posts