IMPIMP

Harshvardhan Patil Vs Dattatray Bharne | इंदापूरात आमदारकीवरून भरणे-पाटील यांच्यात बॅनरवॉर रंगले; जाणून घ्या

by sachinsitapure

इंदापूर: Harshvardhan Patil Vs Dattatray Bharne | आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरु झालेली आहे (Maharashtra Assembly Election 2024). भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट (Shivsena Eknath Shinde), राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) महायुती (Mahayuti) म्हणून विधानसभा निवडणुका एकत्र लढणार आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress), शिवसेना शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT), राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढणार आहेत.

कोणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ जाणार याबाबत कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही संभ्रमावस्था आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातही (Indapur Assembly) ही जागा कोणाला जाणार हे गुलदस्त्यात आहे. या मतदार संघात महायुतीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बॅनर वॉर जोरदार सुरू आहे. त्यामुळे या जागेचा तिढा सोडवण्याची डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांची असणार हे निश्चित आहे.

या जागेवर भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनी दावा केला आहे. विधानपरिषदेला हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती मात्र तसे काही घडताना दिसले नाही.

महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे अजूनही निश्चित नाही. त्या आधीच हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हे कामाला लागले आहे. त्यांनी इंदापूरमध्ये जोरदार बॅनरबाजी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात “आमचा स्वाभिमान आमचे विमान” “आमचं आता ठरलयं, लागा तयारीला विधानसभा २०२४” अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावले आहेत. त्यातून पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर अपक्ष लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या बॅनरबाजीला दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मग इंदापूरात बॅनर झळकवले आहेत. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या बॅनर शेजारीच भरणे यांचे बॅनर लावण्यात आले. “विकासाची परंपरा कायम राखुया, चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया. शिवाय ‘आमचं ठरत नसतं, तर आमचं फिक्स असतं’ असं प्रत्युत्तरही भरणेंच्या समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून दिले आहे.

Related Posts