IMPIMP

HDFC Bank ने दिला धक्का, PayZapp वॉलेटचा वापर होणार महाग, क्रेडिट कार्डने लोड केल्यास लागणार चार्ज

by sachinsitapure

नवी दिल्ली : HDFC Bank | जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. बँकने काही दिवसांपूर्वीच आपल्या क्रेडिट कार्ड यूजर्ससाठी अनेक बदल केले आहेत. आता एचडीएफसी बँकेने त्यांच्या पेझॅप वॉलेट (PayZapp Wallet) चा वापर महाग केला आहे. आतापर्यंत क्रेडिट कार्ड (Credit Card) द्वारे पे-झॅप वॉलेटमध्ये फंड लोड केल्यास चार्ज लागत नव्हता. १ ऑगस्ट २०२४ पासून क्रेडिट कार्डद्वारे पेझॅप वॉलेटमध्ये फंड लोड केल्यास चार्ज द्यावा लागेल.

बँकेने एसएमएस पाठवून ग्राहकांना याबाबत सूचना दिली आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार, जर एखाद्या ग्राहकाने पेझॅप वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे जमा केले तर त्यास १.५ टक्के प्लस जीएसटी एक्सट्रा चार्ज द्यावा लागेल. मात्र, पेझॅप वॉलेटमध्ये युपीआय अथवा डेबिट कार्डद्वारे पैसे जमा केल्यास चार्ज लागणार नाही.

पेझॅप वॉलेटमधील फंड बँक खात्यात ट्रान्सफर करणे महागले

सध्या पेझॅप वॉलेटमधील फंड बँक खात्यात ट्रान्सफर केल्यास १ टक्का अधिक जीएसटी जार्च द्यावा लागतो, १ ऑगस्टपासून हा चार्ज २.५ टक्के अधिक जीएसटी असा द्यावा लागे.

क्रेडिट कार्डने भाडे भरणे महागले

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड होल्डरने क्रेड, पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज सारख्या पार्टी प्लेटफॉर्मद्वारे केलेल्या रेंट पेमेंट वर १ टक्का शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. हा नियम सुद्धा १ ऑगस्टपासून लागू होईल.

Related Posts