IMPIMP

Health Tips | मेंदू आणि शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ 6 विशेष पदार्थांचा समावेश

by nagesh
 Health Tips | healthy foods that can activate your mind and health at winter

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Health Tips | हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. या हंगामात आपली इम्युनिटी कमकुवत राहते, तसेच थंडीमुळे होणारे आजारही आपल्याला त्रास देतात. या हंगामात आपल्याला आळस जाणवतो. आळसामुळे अंथरुणावर अधिकाधिक वेळ झोपावे असे वाटते. (Health Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जर तुम्हाला हिवाळ्यात सुस्ती आणि आळस वाटत असेल तर तुमच्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल. या पदार्थांमुळे शरीर सक्रिय राहते, त्याचप्रमाणे मनही सक्रिय राहते. (Health Tips)

 

न्यूट्रिशनल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमा नायडू यांनी इन्स्टाग्रामवर अशा पदार्थांची यादी शेअर केली आहे, ज्यामुळे मन आणि शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे हिवाळ्यात सुस्ती दूर होईल. डार्क चॉकलेट, बेरी आणि विविध प्रकारची आंबट फळे यांसारखे अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थ सुस्ती आणि थकवा कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

 

ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड समृध्द पदार्थ मेंदूचे कार्य सुधारतात, हे साध्य करण्यासाठी आहारात नट, एवोकॅडो आणि सीफूडचा समावेश करा.

 

आळस आणि थकवा दूर करण्यासाठी विशेष गोष्टी :

1. एवोकॅडो (Avocado) :
एवोकॅडो हे एक फळ आहे जे ल्युटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे फळ मेंदूच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करते. तुम्ही ते स्मूदी म्हणून वापरू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2. जांभूळ (Java Plum) :
पोषक तत्वांनी समृद्ध जांभूळ तुमच्या मेंदूतील रक्ताभिसरण चांगल्या स्थितीत ठेवते, तसेच मानसिक आरोग्य सुधारते.

 

3. डार्क चॉकलेट (Dark Chocolate) :
डार्क चॉकलेट मानसिक थकवा कमी करते, मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते आणि स्मरणशक्ती वाढवते. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमची एकाग्रता कमी होत आहे, तेव्हा डार्क चॉकलेटचे सेवन करा.

 

4. अंडी (Egg) :
स्वादिष्ट मल्टीविटामिन अंडी हे असे अन्न आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंडी खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते.

 

5. हिरव्या भाज्या (Green vegetables) :
मेंदू आणि एकूणच आरोग्यासाठी हिरव्या भाज्या सर्वोत्तम आहेत. सिमला मिरची, फ्लॉवर, हिरवी बीन्स, ब्रोकोली, हिरव्या भाज्या आणि पालक यांसारख्या भाज्यांमध्ये फायबर, प्रोटीन यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

6. बीट्स (Beats) :
चवीला गोड असलेल्या बीटमध्ये नायट्रिक ऑक्साईड भरपूर असते जे रक्ताभिसरण सुधारून मेंदूच्या कार्याला चालना देते. तुम्ही याचे सेवन ज्यूस आणि सॅलडच्या स्वरूपात करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | healthy foods that can activate your mind and health at winter

 

हे देखील वाचा :

Tips to Get Rid of Mucus | सर्दीनंतर छातीत साठला असेल कफ तर ‘या’ 4 पद्धतीने मिळवा आराम

Tanaji Sawant | तानाजी सावंतांचे ते वक्तव्य दुर्दैवी, जबाबदार लोकांनी…, विखे पाटलांनी टोचले कान

Maratha Reservation | बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, नाना पटोलेंची मागणी (व्हिडिओ)

 

Related Posts