IMPIMP

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या

by nagesh
Health Tips | soak 5 things at night and eat in the morning the illness will stay long easy remedy health tips news

सरकारसत्ता ऑनलाइन – Health Tips | खाण्यापिण्यावर नियंत्रण नसल्याने माणसाला आरोग्याचा परिणाम जाणवतो. आरोग्य बिघडू नये म्हणून योग्य आहार घेणे आवश्यक असते. मात्र नेमकं आहारामध्ये कोणते पदार्थ असावे याची माहिती अनेकांना नसते (Health And Nutrition Tips). दरम्यान आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ अनेक असतात. त्यामध्ये जवस, मनुके हिरवे मूग, खसखस, मेथी अशा पदार्थातून माणसाच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर गुणधर्म आहे. या 5 गोष्टी रात्री भिजत घालून खाल्ल्याने आरोग्यासाठी (Health Tips) खूप फायदा होतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. खसखस (Poppy Seeds) –
चयापचय क्रिया (Metabolism) सुधारण्यासाठी खसखस फायदेशीर ठरते. रात्रभर खसखस भिजवून सकाळी खाल्ल्यास शरीरात चरबी जमा होत नाही. स्थूलपणा कमी होतो. लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी होते. (Health Tips)

 

2. जवस (Flax) –
जवसामध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड (Omega 3 Fatty Acid) भरपूर प्रमाणात असतं. एक चमचा जवस पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सकाळी खाल्यास हाय कोलेस्टेराॅल कमी होतं. रक्तातील साखर आणि कोलेस्टेराॅलची पातळी नियंत्रित (Blood Sugar And Cholesterol Level) ठेवण्यासाठी भिजवलेले जवस फायदेशीर असतात. जवसामध्ये आहारीय तंतूमय घटकाचं प्रमाण जास्त असल्याने भिजवलेले जवस खाल्ल्याने पचन व्यवस्थेचे काम सुधारतं.

 

3. मेथ्या (Fenugreek) –
मेथ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी हे फायबर महत्वाचे असतात. बध्दकोष्ठतेच्या समस्येने (Constipation Problem) ग्रस्त लोकांसाठी मेथ्या भिजवून खाणं फायदेशीर आहेत. एक चमचा मेथ्या रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने पचन व्यवस्था नीट काम करते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, पाळीतील वेदना कमी करण्यासाठी मेथ्यांचं सेवन फायदेशीर ठरतं.

 

4. हिरवे मूग (Green Mung Bean) –
भिजवलेल्या हिरव्या मुगामध्ये प्रथिनं, फायबर आणि ब जीवनसत्व (Protein, Fiber And Vitamins B) असतं.
भिजवलेले हिरवे मूग खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.भिजवलेल्या हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम (Potassium, Magnesium)
यांचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हिरवे मूग रात्री भिजवून सकाळी अवश्य खावेत.
हिरव्या मुगात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असल्यानं शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होतं.
मधुमेह, कर्करोग, जुनाट आजारांचा धोका (Diabetes, Cancer, Chronic Diseases Risk ) कमी होतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. मनुके (Raisins) –
मनुक्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह हे घटक असतात.
रोज रात्री मनुका भिजवून सकाळी खाल्ल्याने वजन नियंत्रित ठेवण्या सोबतच शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखता येते.
भिजवलेले मनुके खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. ॲनेमियासारख्या समस्यांच धोका टळतो.

 

Web Title :- Health Tips | soak 5 things at night and eat in the morning the illness will stay long easy remedy health tips news

 

हे देखील वाचा :

Mukesh Ambani RIL | 20 रुपयांवरून 2400 च्या पुढे पोहचला मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

Related Posts