IMPIMP

Mukesh Ambani RIL | 20 रुपयांवरून 2400 च्या पुढे पोहचला मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त

by nagesh
Mukesh Ambani | death threat to mukesh ambani and his family

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामुकेश अंबानी (Mukesh Ambani RIL) यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries) कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त रिटर्न दिला आहे. गेल्या काही वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 20 रुपयांवरून 2400 रुपयांपर्यंत वाढले आहेत. (Mukesh Ambani RIL)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कंपनीच्या शेअरनी गेल्या 24 वर्षांत गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. ज्यांनी 24 वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि त्यांची गुंतवणूक कायम ठेवली असेल, आज ती रक्कम 4 कोटींहून अधिक झाली आहे.

 

1 लाख रुपये 4 कोटींहून झाले जास्त

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 28 ऑगस्ट 1998 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 19.98 रुपयांच्या पातळीवर होता.
जर एखाद्या व्यक्तीने त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 5005 शेअर्स मिळाले असते. (Mukesh Ambani RIL)

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने 26 नोव्हेंबर 2009 आणि 7 सप्टेंबर 2017 रोजी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत.
म्हणजेच 5005 शेअर्स आता 20,020 शेअर्स झाले असते.
1 जुलै 2022 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2408.95 रुपयांवर बंद झाला.
म्हणजेच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य आजपर्यंत 4.82 कोटी रुपये असेल.

 

300 वरून 2400 रुपयांपर्यंत पोहोचला आरआयएल शेअर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 16 जानेवारी 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 301.73 रुपये होता.
1 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर बीएसईवर 2408.95 रुपयांवर बंद झाला.

जर एखाद्या व्यक्तीने 16 जानेवारी 2009 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता हे पैसे 8 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 2016.60 रुपये आहे.
त्याच वेळी, कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2885 रुपये आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Mukesh Ambani RIL | mukesh ambani reliance industries turned 1 lakh rupee into more than 4 crore rupee

 

हे देखील वाचा :

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts