IMPIMP

Income Tax On Super Rich Peoples | श्रीमंतांच्या खजिन्यावर नजर! पुढील महिन्यात होऊ शकतो जास्त पैसे वसुल करण्याचा निर्णय, ४ पैकी ३ भारतीयांची ही इच्छा

by sachinsitapure

नवी दिल्ली : Income Tax On Super Rich Peoples | जी-२० देशांचे अर्थमंत्री पुढील महिन्यात जगातील अति श्रीमंतांवर (सुपर-रिच) संपत्ती कर (वेल्थ टॅक्स) लावण्याबाबत चर्चा करतील. याच दरम्यान एका सर्वेत समोर आले आहे की, या देशांमधील ६८ टक्के लोक श्रीमंतांवर अशाप्रकारचा कर लावण्याच्या बाजूने आहेत. भारतात तर हा आकडा आणखी जास्त म्हणजे ७४ टक्के आहे. म्हणजे ४ पैकी ३ भारतीयांना वाटते की, सुपर रिच लोकांकडून जास्त कर वसूल केला जावा. या लोकांचे म्हणणे आहे की, जागतिक स्तरावरील उपासमार, विषमता आणि जलवायु संकटाला तोंड देण्यासाठी अशाप्रकारचा कर लावला जावा.

अर्थ फॉर ऑल इनिशिएटिव्ह अँड ग्लोबल कॉमन्स अलायन्सच्या सर्वेक्षणात जागातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी २२,००० लोकांचे मत घेण्यात आले. सुपर-रिच वर कर लावण्याचा प्रस्तावर २०१३ पासून सातत्याने चर्चेत आणि मागील काही वर्षात या मुद्द्यावर अंतरराष्ट्रीय समर्थन वाढत आहे.

जी-२० देशाचा सध्याचा अध्यक्ष ब्राझीलचे लक्ष्य श्रीमंतांवर टॅक्स लावण्याबाबत सहमती तयार करण्यावर आहे. जुलैमध्ये जी-२० च्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत याबाबत संयुक्त घोषणेवर जोर दिला जाण्याची शक्यता आहे.

फ्रान्सचे अर्थतज्ज्ञ गॅब्रियल झुकमॅन मंगळवारी याबाबत एक रिपोर्ट सादर करतील की अति श्रीमंतांवर जागतिक स्तरावर किमान कर कसा कार्य करेल आणि तो किती वाढवता येऊ शकतो. ब्राझीलच्या जी-२० मध्ये अशाप्रकारच्या प्रस्तावापाठीमागे झुकमॅन यांचीच कल्पना आहे.

किती लागेल टॅक्स

झुकमॅन यांचे म्हणणे आहे की, सामान्य लोकांच्या तुलनेत अति श्रीमंत लोक खुपच कमी टॅक्स देतात. प्रस्तावाचा उद्देश एक नवीन अंतरराष्ट्रीय मानदंड स्थापन करण्याचा आहे. प्रत्येक देशातील अरबपती व्यक्तीला या प्रस्तावाअंतर्गत आपल्या संपत्तीच्या दोन टक्के वार्षिक टॅक्स द्यावा लागेल.

Related Posts