IMPIMP

Indapur Bhima River | इंदापुरात भीमा नदीत बोट बुडाली, 6 जण बेपत्ता, 17 तासांनंतर बोट सापडली, पोलीस उपनिरीक्षक डोंगरे बचावले, एनडीआरएफचे शोधकार्य सुरू

by sachinsitapure

सोलापूर : Indapur Bhima River | सोलापुरातल्या उजनी जलाशयात (Ujani Dam) प्रवाशांना घेऊन निघालेली एक बोट मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बुडाली. यावेळी एकच हलकल्लोळ उडाला. अनेकांनी बोट बुडताना उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी (PSI Rahul Dongre) उडी मरून कळाशी गावाचा काठ गाठल्याने ते बचावले. बुडालेली बोट १७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढली असली तरी अजूनही ६ प्रवाशी बेपत्ता असून ते दगावल्याची भीती व्यक्त होत आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बोटीतील बेपत्ता ६ प्रवाशांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाचे शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, बुडालेली बोट बाहेर काढण्यात एनडीआरएफला (NDRF) यश आले असून ती ३५ फूट पाण्यात तळाला सापडली.

सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी प्रवाशी वाहतूक करणारी ही बोट मंगळवारी सायंकाळी बुडाली. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. स्थानिक बोटींच्या मदतीने देखील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. बोटीतील एक प्रवाशी पोहत बाहेर आल्यानंतर ही दुर्घटना सर्वांना समजली.

वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तनुसार, या बोटीतून पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हेसुद्धा प्रवास करत होते. अचानक बोट बुडू लागद्यल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली आणि पोहत कळाशी गावाच्या काठावर ते गेले, यामुळे त्यांचा जीव वाचला.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार दत्तात्रय भरणे हे घटनास्थळी आले. तसेच त्यांनी घटनेचा आढावा घेतला. तसेच माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Unauthorised Hoardings In Pune | स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानंतरही धोकादायक निदर्शनास आलेली अधिकृत होर्डींग्जही काढणार

Related Posts