IMPIMP

Indeed Report Survey | AI नोकऱ्या खाणार की निर्माण करणार? या विशेष स्किलने होईल तुमचे काम

by sachinsitapure

नवी दिल्ली : Indeed Report Survey | आर्टिफिशियल इन्टेलिजन्स म्हणजे AI ची कक्षा वेगाने वाढल्याने नोकरदार लोकांमध्ये याच्याबाबत चिंता आणि उत्सुकता सातत्याने वाढत आहे. कोणाला नोकरी जाण्याची भिती आहे कर कोणाचे या नवीन सेक्टरमध्ये मिळणाऱ्या जॉबवर बारीक लक्ष आहे. अखेर AI मध्ये भविष्य शोधणाऱ्यांना कोण-कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळतील याचा खुलासा हायरिंग प्लॅटफॉर्म इंडीडच्या अलिकडील सर्वेत (Indeed Report) करण्यात आला आहे.

या सर्वेनुसार, मशीन लर्निंग एआयचे असे सेगमेंट असेल, जिथे सर्वात जास्त नोकऱ्या मिळतील. इंडीडच्या सर्वेनुसार, ४२ टक्के एआय नोकऱ्यांमध्ये मशीन लर्निंगसाठी मागणी असेल. तर ४० टक्के नोकऱ्यांमध्ये पायथॉन स्किलची मागणी असेल, हे स्किल एआय आणि मशीन लर्निंगमध्ये खुप उपयोगी आहे.

एआयच्या ३६ टक्के नोकऱ्यांमध्ये मागणी असेल. तसेच कम्युनिकेशन स्किल्सच्या सुद्धा २३ टक्के एआय नोकऱ्यांची मागणी राहील आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगची सुद्धा एआयशी संबंधीत २० टक्के नोकऱ्यांमध्ये गरज असेल.

१७ अरब डॉलरचे होईल मार्केट

आर्टिफिशियल इन्टेलिजन्स येत्या वर्षांमध्ये कशाप्रकारे भारतीय बाजारात आपले बस्तान बसवणार याचा अंदाज नेस्कॉम आणि बीसीजीच्या अंदाजावरून लावता येऊ शकतो, ज्यांच्यानुसार २०२७ पर्यंत भारतीय एआय मार्केट १७ अरब डॉलरचे होईल. ते २५ ते ३५ टक्केच्या CAGR ने वाढेल. जाणकारांनुसार, या वाढीच्या हिशेबाने भारतीय एम्प्लॉयरला एआय स्किल्स ओळखून हायरिंग करावे लागेल.

भारतीय एम्प्लॉयरमध्ये केलेल्या सर्वेनुसार, ८५ टक्के पुढील १ ते ५ वर्षात एआय हायिरंगबाबत तयार आहेत. अशावेळी भारताला टॅलेंट स्किल एआयच्या स्तरावर आणण्यासाठी खुप काम करण्याची गरज असेल.

कसे मिळतील एआय जॉब?

एआय स्किलच्या नोकऱ्यांमध्ये डिमांड असेल तर त्यामध्ये सहभागी आहेत टेन्सरफ्लो ज्याची मागणी एआयच्या १९ टक्के नोकऱ्यांमध्ये असेल, डेटा सायन्सची १७ टक्के, AWS आणि डिप लर्निंगची १४ टक्के, जावाची १० टक्के, Azure ची ११ टक्के, इमेज प्रोसेसिंग आणि SQL ची १०-१० टक्के, PyTorch ची ९ टक्के, आणि Agile ची एआयशी संबंधीत ८ टक्के नोकऱ्यांमध्ये मागणी असेल.

Related Posts