IMPIMP

Insurance Claim – Heavy Rains | पावसातील समस्या… जर पुरात वाहून गेली कार-बाईक, जाणून घ्या इन्श्युरंस क्लेम मिळेल की नाही?

by sachinsitapure

नवी दिल्ली : Insurance Claim – Heavy Rains | सध्या काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) पुराच्या पाण्यात बुडालेल्या गाड्यांचे फोटो सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. पावसाळ्यात कार-बाईक पुराच्या पाण्यात बुडण्याचा मोठा धोका असतो. यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी पुरात कार-बाईक बुडाली तर इन्श्युरंस क्लेम मिळतो का? याबाबत जाणून घेऊया…

मोटर वाहन कायदा-१९८८ नुसार, पूर, पाऊस, वादळ अथवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान ऑन डॅमेज कव्हरमध्ये येते. यासाठी अशी विमा पॉलिसी निवडा, ज्यामध्ये इंजिन सुरक्षा अ‍ॅड-ऑनचे ऑपशन मिळेल.

जर तुम्ही तुमच्या वाहनासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह मोटर इन्श्युरंस (Motor Insurance) घेतला असेल तर तुम्ही वादळ, चक्रीवादळ, गारपीट, मुसळधार पाऊस, पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीसाठी क्लेम करू शकता.

विम्याचे दोन कम्पोनंट असे करतात काम
या पॉलिसीत दोन कम्पोनंट असतात. एक ऑन डॅमेज आणि दुसरा थर्ड पार्टी कव्हर. ऑन डॅमेज तुमच्या कारचे आपत्ती अथवा इतर कारणामुळे झालेले नुकसान कव्हर करतो आणि विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देते.

सामान्यपणे पाहिले तर पाऊस अथवा पुरामध्ये अडकलेल्या गाड्यांचे इंजिनपासून बॉडीपर्यंत मोठे नुकसान होते. बाजारात अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या अशाप्रकारचे डॅमेज कव्हर करतात. केवळ विमा घेताना कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज असते.

अशाप्रकारे क्लेम करा इन्शुरंस

* आपल्या पॉलिसी नंबरचा वापर करून संबंधित विमा कंपनीच्या टोल-फ्री नंबरवर क्लेमसाठी रजिस्टर करा.

* कंपनीच्या वेबसाईटवरून क्लेम फॉर्म डाऊनलोड करून तो भरा. सर्व कागदपत्र जमा करा आणि क्लेम फॉर्म सबमिट करा.

* क्लेम अप्लायनंतर कंपनी सर्वेयर अथवा व्हिडिओ सर्वेने वाहनाची तपासणी होईल. यावेळी सर्व कागदपत्र तुमच्या जवळ ठेवा.

* वाहनाचा सर्वे पूर्ण झाल्यावर सर्वेयर आपला रिपोर्ट फाईल करेल आणि यानंत तुमचा इन्शुरंस क्लेम येईल.

Related Posts