IMPIMP

ITR Filing 2023-2024 | जर विसरला असाल प्राप्तीकर पोर्टलचा पासवर्ड, तर असा करा रिसेट, येथे जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by sachinsitapure

नवी दिल्ली : ITR Filing 2023-2024 | इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. आता आयटीआर फाईल करण्यासाठी जास्त दिवस उरलेले नाहीत. अशावेळी आयटीआर फाईल करण्यापूर्वी तुम्ही काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवली पाहिजेत. अनेकदा सर्व कागदपत्रे तयार असतात परंतु ई-फायलिंग पोर्टलचा पासवर्ड लोक विसरतात. हा पासवर्ड रिसेट करण्याची प्रोसेस खुप सोपी असून ती जाणून घेऊया.

आधार आणि ओटीपीद्वारे पासवर्ड सेट करा

* सर्वप्रथम ई-फायलिंगच्या होमपेजवर जाऊन लॉग इनवर क्लिक करा.
* आता यूजर आयडी नोंदवल्यानंतर Forgot Password option सिलेक्ट करा.
* यानंतर समोर पासवर्ड रिसेट ऑपशन येईल.
* पासवर्ड रिसेटसाठी मोबाईल ओटीपी पर्याय निवडा.
* आता मोबाईलवर आलेला ओटीपी भरा, ज्यानंतर नवीन पासवर्ड रिसेट करू शकता.
* एक लक्षात ठेवा, आधार लिंक्ड मोबाईल नंबरवरच हा ओटीपी येईल.

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) द्वारे करा पासवर्ड रिसेट

* सर्वप्रथम ई-फायलिंग पेजवर जाऊन लॉग-इन करा.
* आता यूजर आयडी नोंदवा आणि Forgot Password पर्याय निवडा.
* यानंतर पासवर्ड रिसेट करण्यासाठी Digital Signature Certificate (DSC) चा ऑपशन सिलेक्ट करा.
* आता DSC अपलोड करा आणि पुढे जा.
* यानंतर नवीन पासवर्ड नोंदवा आणि आता तुमचा पासवर्ड रिसेट झाला आहे.

Related Posts