IMPIMP

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!

by nagesh
 Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First 'Joshi Sports Karandak' Premier League T20 Cricket Tournament; Spartans Cricket Club Team Champion !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket) स्पर्धेत स्पार्टन्स् क्रिकेट क्लब संघाने एलके इलेव्हन संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात किरण दातार याच्या ८६ धावांच्या खेळीमुळे स्पार्टन्स् संघाने एलके इलेव्हन संघाचा १७ धावांनी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने २० षटकामध्ये ६ गडी गमावून १८५ धावांचे आव्हान उभे केले. किरण दातार याने ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८६ धावांची खेळी साकारली. सलामीवीर भूषण सवे याने ३१ धावांचे योगदान दिले. यामध्ये विपुल खैरे (३-२९) याने अचूक गोलंदाजी केली. या आव्हानासमोर एलके इलेव्हन संघाचा डाव १६८ धावांवर मर्यादित राहीला. गिरीष कोंडे याने ५१ धावांची खेळी केली.

 

तिसर्‍या क्रमांकासाठीच्या सामन्यात उत्कर्ष चौधरी अष्टपैलू खेळीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स संघाने कल्याण संघाचा ६३ धावांची पराभव केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि जोशी स्पोर्ट्सचे कार्यकारी संचालक गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
विजेत्या स्पार्टन्स् क्रिकेट क्लबला तसेच उपविजेत्या एलके इलेव्हन संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
स्पार्टन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १८५ धावा (किरण दातार ८६ (४९, १० चौकार, ४ षटकार), भूषण सवे ३१,
नचिकेत कुलकर्णी १७, विपुल खैरे ३-२९, गणेश जोशी १-२३) वि.वि. एलके इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १६८
धावा (गिरीष कोंडे ५१ (३४, ४ चौकार, २ षटकार), विपुल खैरे २५, अभिषेक बोधे २२, कृष्णा भट ४-२६,
विवेक कुबेर २-२८); सामनावीरः किरण दातार;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तिसर्‍या क्रमांकासाठीः ग्लोबल वॉरीयर्सः १९ षटकात ६ गडी बाद १६४ धावा (एस. शिंदे ५९ (४५, ५ चौकार, २ षटकार),
उत्कर्ष चौधरी ३३, मोहम्मद ताहीर २१, ऋत्विक महाजन २-७) वि.वि. कल्याण इलेव्हनः १४.५ षटकात १० गडी बाद
१०१ धावा (रोहीत गुगळे ४०, चिराग शेरकर २५, उत्कर्ष चौधरी ३-२६, विकी मंडल २-२१); सामनावीरः उत्कर्ष चौधरी;

 

 

Web Title :-  Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament; Spartans Cricket Club Team Champion !!

 

हे देखील वाचा :

Indian Doctors Premier League T20 Cricket | पहिली ‘इंडियन डॉक्टर्स प्रिमिअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा; दिल्ली चॅम्पियन संघाला विजेतेपद !!

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Dr. Dhende Siddhartha | निराधार 132 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार ! डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संकल्प

 

Related Posts