IMPIMP

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

by nagesh
Chandrakant Patil | chandrakant patil on babri masjid demolition bjp chandrakant patil slam shivsena on babri masjid demolition

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  बाबरी मशीद (Babri Masjid) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भूमिकेबाबत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांबाबत माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतील हिंदू जिवंत आहेत. बाबरी ही हिंदूंनी पाडली आणि त्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) केलं होतं. कोणत्याही एका पक्षाने पाडला नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुंसाठी काम केलं आहे. त्यांच्याबाबतीत माझ्या मनात कधीही अश्रद्धा नव्हती. बाळासाहेबांचा अपमान करणं किंवा त्याचं महत्व कमी करण्यासारखं माझ्या मनातही कधी येणार नाही. यापूर्वी अनेक वेळा बाळासाहेबांचं नाव मी आदरानेच घेतलं आहे आणि ऋणही व्यक्त केले आहे.

 

त्यावेळी सगळे हिंदूच होते

अयोध्या का राम जन्मभूमि (Ayodhya Ram Janmabhoomi) आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरु झालं. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं. त्यासोबतच बजरंग दल (Bajrang Dal) आणि दुर्गा वाहिनी (Durga Vahini) या संघटनादेखील होत्या. त्यावेळी झालेली सर्व आंदोलनं ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाखाली झाली होती. त्यामुळे बाबरीचा ढांचा पाडताना कोण शिवसेनेचा (Shivsena) आणि कोण कुठला असा काहीही भेद नव्हता. त्यावेळी सगळे हिंदू होते. हे सगळे विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते. त्याचकाळात स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी अयोध्या मंदिरासाठी सोन्याची वीट पाठवली होती. यावेळी कोणताही भेद नव्हता सगळे हिंदू होते आणि त्यांनी ढांचा पाडला हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

मातोश्री आणि उद्धव ठाकरेंसोबत चांगलं संबंध

बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांना पाहण्याची आणि त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात कायम आदर आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं नेहमीच होतं. राजकीय हेतू ठेवणारे वाद काढतात. गेल्या काही दिवसांत माझ्या वक्तव्यांचा ‘ध’ चा ‘मा’ करणं होतचं. कोणत्याही प्रकरणात काहीही आरोप मी सहन करणार नाही. त्यांच्याबाबत असलेला आदर आजचा नाही तर तो लहानपणापासूनच आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदू (Hindu) माणसावरचं ऋण कोणीच पुसूच शकत नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोण जयंत पाटील?

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) म्हणाले की, दादा आतापर्यंत कुठे होते? ते त्यावेळी तिथे होते का? त्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास कसा ठेवायचा? यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, कोण जयंत पाटील? कोणत्या जयंत पाटलांबाबत तुम्ही बोलताय? प्रभू श्रीरामाचं नाव घेतलं तर पाल पडल्यासारखं करतात ते आम्हाला काय शिकवणार. तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांबाबत बोलताय का? तेव्हा पत्रकारांनी सांगितले की, तुमच्या शेजारच्या गावातल्या जयंत पाटलांबाबत विचारतोय.

 

 

उद्धव ठाकरेंना फोन करणार

माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोण जयंत पाटील हे सांगितल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव पाटील काय म्हणतात, हिंदुत्वाच्या विषयावर काय बोलतात याची मी काळजी करण्याची गरज नाही. उद्धवजी (Uddhav Thackeray) काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे. त्यामुळे मी ताबडतोब त्यांना फोन करेन. कारण आमचे तसे संबंध आहेत. मी त्यांना विचारेन, उद्धवजी तुम्ही माझ्या बद्दल असा का गैरसमज करताय? बाळासाहेबांबद्दल मी असा अश्रद्धेने बोलेन का? परंतु जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर मी कशाला बोलू.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil on babri masjid demolition bjp chandrakant patil slam shivsena on babri masjid demolition

 

हे देखील वाचा :

Dr. Dhende Siddhartha | निराधार 132 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार ! डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संकल्प

Senior Journalist Raja Mane | ज्येष्ठ संपादक राजा माने यांना “न्यूज मेकर्स अचिव्हर्स “राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ! 1 मे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण

Uddhav Thackeray | आता कुणाला जोडे मारणार आहात?, उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी (व्हिडिओ)

 

Related Posts