IMPIMP

July Rules Changed | आजपासून झाले ‘हे’ 7 मोठे बदल, क्रेडिट कार्डपासून LPGच्या दरावर झाला परिणाम!

by sachinsitapure

नवी दिल्ली : July Rules Changed | आजपासून नवीन महिना जुलैची सुरूवात झाली आहे. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशात अनेक मोठे बदल दिसून येतात, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बँक खात्यापासून स्वयंपाक घरापर्यंत होतात. १ जुलै २०२४ ला एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून क्रेडिट कार्डपर्यतच्या नियमात बदल झाले आहेत. या बदलांमुळे खिशावर किती परिणाम होईल ते जाणून घेऊया…

१. कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर झाले कमी (Lpg Cylinder Price)

सोमवारी देशातील इंधन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. ३० ते ३१ रुपयांनी कमर्शियल सिलेंड स्वस्त झाला आहे.

२. आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्डच्या नियमात बदल (ICICI Cridit Card)

आयसीआयसीआय बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमात १ जुलैपासून बदल केला असून बँकेने क्रेडिट कार्डसंबंधील सर्विस चार्जमध्ये बदल केला आहे. आता ग्राहकांना कार्ड रिप्लेसमेंटसाठी १०० रुपयांऐवजी २०० रुपये द्यावे लागतील. तसेच बँकेने चेक अथवा कॅश पिक अप फी, चार्ज स्लीप इत्यादीचे सेवा शुल्कात बदल केला आहे.

३. एसबीआई क्रेडिट कार्डच्या नियमात बदल (SBI Cridit Card)

एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी ट्रांजक्शनवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स सुविधा बंद केली आहे. हा नियम १ जुलै २०२४ पासून लागू झाला आहे.

४. येथे अल्पवयीनांना मिळणार नाही पेट्रोल

उत्तर प्रदेशात आजपासून १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना पेट्रोल पंपावर दुचाकी अथवा चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल दिले जाणार नाही. हा नियम आजपासून लागू आहे.

५. पीएनबी बँक खात्याच्या नियमात बदल (PNB Bank Account)

पंजाब नॅशनल बँक वापरात नसलेली झीरो बॅलन्स असलेली, निष्क्रिय अकाऊंट्स १ जुलैपासून बंद करणार आहे.

६. महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरू (Ladki Bahin Yojana )

महाराष्ट्र सरकारने महिलांना दर महिना १५०० रुपयांची आर्थिक मदत देणारी योजना १ जुलै २०२४ पासून लागू केली आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६० वर्षापर्यंतच्या महिला घेऊ शकतात.

७. सिम कार्डच्या नियमात बदल (Sim Card Rules)

यापूर्वी सिम कार्ड चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास ताबडतोब स्टोअरमधून दुसरे सिम कार्ड मिळत होते, परंतु आता यासाळी लॉकिंग पीरियड ७ दिवसांचा करण्यात आला आहे. हा नवीन नियम १ जुलैपासून २०२४ पासून लागू झाला आहे.

Related Posts