IMPIMP

Kalki 2898 AD | 7 वर्षांपूर्वी बनवला होता जगातील सर्वात महागडा चित्रपट, ‘कल्की’ पेक्षा सुद्धा ६ पट जास्त, कमाई जाणून व्हाल हैराण

by sachinsitapure

नवी दिल्ली : बॉक्‍स ऑफिसवर गाजत असलेल्या कल्की (Kalki 2898 AD) चित्रपटाला सर्वात महाग चित्रपट मानले जात आहे. आपल्या खर्चाप्रमाणे चित्रपट कमाई सुद्धा करत आहे. महागडा चित्रपट आरआरआरला सुद्धा कल्की ने मागे टाकले आहे. पण जगातील सर्वात महागडा चित्रपट वेगळाच आहे. हॉलीवुडच्या या चित्रपटाचे बजेट कल्की पेक्षा सुद्धा ६ पट जास्त होते.

कल्की चित्रपट बनवण्यासाठी ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर चित्रपट आरआरआर ५५० कोटी रुपयात बनवला होता. मात्र जगातील सर्वात महागडा चित्रपट स्‍टार वॉर सीरीज चा द फोर्स अवेकन होता, जो बनविण्यासाठी ४४.७ कोटी डॉलर खर्च झाले. भारतीय रुपयात हे ३,७१० कोटी रुपये होतात.

स्‍टार वॉर सीरीजचा हा सातवा चित्रपट होता आणि १५ वर्षानंतर चित्रपटगृहात तो पोहोचला होता. तत्पूर्वी सर्वात महागडा चित्रपट Pirates of the Caribbean: On Stranger Tides होता, जो ३,१४५ कोटी रुपयात बनवला होता. अवेन्जर्स : एज ऑफ अल्‍ट्रॉन ३,०२९.५ कोटी रुपयात बनवला होता.

स्‍टार वॉर सीरीजचा हा चित्रपट महागडा होता, शिवाय सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये देखील त्याचे नाव आहे. या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना खुश केले आणि बॉक्‍स ऑफिस कलेक्‍शन २ अरब डॉलर केले जे आजच्या रुपयात सुमारे १६,६०० कोटी होईल. या चित्रपटाला ५ ऑस्‍कर नॉमिनेशन सुद्धा मिळाले होते.

भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट
कलेक्‍शनच्या पाहिले तर भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट दंगल समजला जातो. या चित्रपटाने जगभरात २,००० कोटी रुपये कमावले. बाहुबलीच्या दोन्ही पार्टची एकुण कमाई देखील २,४०० कोटी रुपये होईल, जी स्‍टॉर वारच्या सर्वात महागड्या चित्रपटाच्या प्रॉडक्‍टशन कॉस्‍टपासून खुप दूर आहे.

Related Posts