IMPIMP

Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण: रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे?; या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता

by sachinsitapure

पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे.अपघात घडल्यानांतर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आरोपी मुलाला रक्त तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांच्या मदतीने घेतलेल्या रक्ताचे नमुने बदलल्यात आल्याचे पोलीस चौकशीत समोर आले होते. याबाबत ससूनच्या दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबत आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल (Shivani Vishal Agarwal) यांनाही पोलिसांनी अटक केली होती.

रक्ताचे नमुने बदलल्या (Blood Sample Tampering Case) प्रकरणी डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor), शिपाई अतुल घटकांबळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. “अगरवाल दाम्पत्याच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी (DNA Test) पाठवायचे आहेत. विशालने घटकांबळे याच्याशी संपर्क साधला होता. दोन मध्यस्थांच्या माध्यमातून विशालने डॉ. हळनोरला तीन लाख रुपये दिल्याचे तपासात उघडकीस आले.

या प्रकरणात मध्यस्थांचा शोध घ्यायचा आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी वापरलेली सुई (सीरींज) आणि रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे दिला असल्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असून,अगरवाल दाम्पत्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विशाल कोंघे यांनी युक्तिवादात केली.

आरोपींच्या वतीने ऍड. प्रशांत पाटील (Adv Prashant Patil) यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश एस.एस वाघमारे यांनी अगरवाल पती-पत्नीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

१९ मे रोजी आरोपी मुलाला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यादिवशीचे सीसीटीव्ही चित्रण (CCTV Footage) पोलिसांनी (pune Police) ताब्यात घेतले असून चित्रीकरणातून तपासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती मिळणार आहे.

अगरवाल दाम्पत्याने कोणाच्या मदतीने ससून रुग्णालयातील डॉ. तावरे यांच्याशी संपर्क साधला, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. हळनोरला कोणी सांगितले यादृष्टीने पुढील तपास सुरु असल्याचे (Pune Crime Branch) सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe) यांनी सांगितले.

Related Posts